तीन चिमुकल्यांसह आईची आत्महत्या
By Admin | Updated: April 2, 2015 02:51 IST2015-04-02T02:51:25+5:302015-04-02T02:51:25+5:30
तालुक्यातील समशेरपूरपासून चार किलोमीटर अंतरावरील मुथाळणे गावातील कानडवाडी शिवारात एका विहिरीत महिलेसह तिच्या तीन मुलांचे मृतदेह आढळल्याची घटना बुधवारी सायंकाळी उघडकीस आली.

तीन चिमुकल्यांसह आईची आत्महत्या
अकोले (अहमदनगर) : तालुक्यातील समशेरपूरपासून चार किलोमीटर अंतरावरील मुथाळणे गावातील कानडवाडी शिवारात एका विहिरीत महिलेसह तिच्या तीन मुलांचे मृतदेह आढळल्याची घटना बुधवारी सायंकाळी उघडकीस आली.
पुनाबाई चंदर फोडसे (३३), समीर (५), पिंटी (५ महिने),
प्रियंका (सावत्र मुलगी, १३) अशी मृतांची नावे आहेत. कानडवाडी येथील कारभारी पुंजाजी सदगीर यांच्या शेतातील सिमेंट बंधाऱ्याजवळ नाना रामा फोडसे यांची तीन परस खोल विहीर आहे. त्यात चार मृतदेह तरंगताना आढळले. पोलिसांनी अकस्मात मृत्युची नोंद केली
आहे. रात्री उशिरा चारही मृतदेह अकोले ग्रामीण रूग्णालयात
उत्तरीय तपासणीसाठी नेण्यात
आले. (प्रतिनिधी)