आईसमोरच मुलीचा मृत्यू
By Admin | Updated: March 6, 2017 02:32 IST2017-03-06T02:32:55+5:302017-03-06T02:32:55+5:30
जागतिक महिला दिनानिमित्त सायकल शर्यतीदरम्यान सायकलवरून पडून पंधरावर्षीय मुलीचा बदलापूरमध्ये मृत्यू झाला

आईसमोरच मुलीचा मृत्यू
बदलापूर : जागतिक महिला दिनानिमित्त सायकल शर्यतीदरम्यान सायकलवरून पडून पंधरावर्षीय मुलीचा बदलापूरमध्ये मृत्यू झाला. श्रेया देवेंद्र म्हात्रे असे या मुलीचे नाव असून ती कात्रप विद्यालयात नववीत शिकत होती.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सखी या संस्थेच्या वतीने रविवारी सायकल स्पर्धा झाली. या स्पर्धेत बदलापूर पूर्वेकडील खरवई येथे राहणारी श्रेयाही सहभागी झाली होती. अंबरनाथ-बदलापूर रस्त्यावरील डी मार्टपासून सुरू झालेल्या या शर्यतीत सायकल चालवत श्रेया सकाळी १० च्या सुमारास कात्रप भागातील अॅक्सिस बँंकेसमोरील रस्त्यापर्यंत आली. तेथून पुढे जात असताना ती सायकलवरून पडून गंभीर जखमी झाली. श्रेयाच्या मागोमाग तिची आई दुचाकीवरून येत होती. तिने तत्काळ श्रेयाला रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत म्हणून जाहीर केले. याप्रकरणी बदलापूर पूर्व पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. (प्रतिनिधी)