३० हजारांसाठी आईने केली मुलीची विक्री...

By Admin | Updated: March 8, 2016 21:25 IST2016-03-08T21:25:22+5:302016-03-08T21:25:22+5:30

राजस्थानमधील श्रीमंत युवकासोबत विवाह करण्यासाठी एका तरूणीला ३० हजार रुपयांना विकल्याची खळबळजनक घटना उघड झाली असून मुलीच्या लग्नाच्याच दिवशी सोमवारी तिच्यावर दलालाने बलात्कार केला.

Mother's daughter sells 30 thousand for sale ... | ३० हजारांसाठी आईने केली मुलीची विक्री...

३० हजारांसाठी आईने केली मुलीची विक्री...

नांदेडमध्ये ३० हजारांत तरुणीची विक्री आईसह सात जणांना अटक : लग्नाच्या दिवशीच दलालाकडून बलात्कार

नांदेड : राजस्थानमधील श्रीमंत युवकासोबत विवाह करण्यासाठी एका तरूणीला ३० हजार रुपयांना विकल्याची खळबळजनक घटना उघड झाली असून मुलीच्या लग्नाच्याच दिवशी सोमवारी तिच्यावर दलालाने बलात्कार केला. शिवाजीनगर पोलिसांनी पीडित मुलीची आई व काकासह मंगळवारी लालचंद जावेरी, रामनिवास नवरंग जाट, जावेद बाबू शिक्का, शेख गफूर शेख हकीम या राजस्थानातील चौघांसह नाजीया उर्फ नादीराबी शेख सिद्दीकी यांना अटक केली. न्यायालयाने मंगळवारी त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली़ उमरी येथील पीडित मुलीच्या आईला तिच्या पतीने सोडून दिले आहे. ती एक मुलगी व दोन मुलासंह राहते. ५ मार्चला मुलीचा मावसकाका गणपत याने तिचा राजस्थानात एक श्रीमंत तरुणासोबत ३० हजारांच्या मोबदल्यात विवाह लावून देण्याचे आमिष माय-लेकिला दाखविले. त्यानंतर त्या रेल्वेने नांदेडला आल्या. रेल्वेस्थानकावर नाजीया उर्फ नादीराबी शेख सिद्दीकी (रा़ विष्णूनगर) तिघांना तिच्या घरी नेले़ तेथे राजस्थानहून आलेल्या चौघांसोबत चर्चा झाली. सर्वजण रात्री नाजियाच्याच घरी थांबले़ ६ मार्चला सकाळी गणपतला ३० हजार रुपये देण्याचे ठरले़ त्यानुसार शेख गफूर यास कमिशन म्हणून काही रक्कम देण्यात आली़ रात्री आठला सर्वांच्या उपस्थितीत मुलीचा विवाह रामनिवास जाट याच्यासोबत लावण्यात आला़ त्यानंतर मुलीची आई व काका निघून गेले़ सहा मार्चला रात्री मुलीसह नाजिया, लालचंद, जावेद, शेख गफूर आणि रामनिवास हे राजस्थानला जाण्यासाठी वसमतला गेले़ रेल्वे स्थानकावर मुक्काम केल्यानंतर ७ मार्चला पहाटे शेख गफूर शेख हकीम याने मुलीला उठवून तुला परत उमरीला नेवून सोडतो, असे सांगून स्थानकाबाहेर तिच्यावर अत्याचार केला़ मुलीने आरडाओरड केल्यानंतर स्टेशन मास्तरांनी पोलिसांना कळविले. त्यानंतर पोलिसांना त्यांना ताब्यात घेतले. मंगळवारी मुलीची आई व मावसकाका गणपत यालाही जेरबंद करण्यात आले़ (प्रतिनिधी)

Web Title: Mother's daughter sells 30 thousand for sale ...