आईवर संशय घेणाऱ्या पित्याची मुलाकडून हत्या

By Admin | Updated: September 1, 2016 05:33 IST2016-09-01T05:33:07+5:302016-09-01T05:33:07+5:30

दारू पिऊन घरात धिंगाणा, करणाऱ्या आणि आईच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला शिवीगाळ करणाऱ्या पित्याची मंगळवारी रात्री २८ वर्षीय मुलाने डोक्यात स्टील रॉडने घाव घालून हत्या केली

Mother killed by father of suspicion | आईवर संशय घेणाऱ्या पित्याची मुलाकडून हत्या

आईवर संशय घेणाऱ्या पित्याची मुलाकडून हत्या

ठाणे : दारू पिऊन घरात धिंगाणा, करणाऱ्या आणि आईच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला शिवीगाळ करणाऱ्या पित्याची मंगळवारी रात्री २८ वर्षीय मुलाने डोक्यात स्टील रॉडने घाव घालून हत्या केली. आजी आणि काका यांनाही त्याने रॉडने मारहाण केली. त्यानंतर, त्याने पोलीस ठाण्यात जाऊन गुन्हा कबूल केला. विष्णू अलझेंडे असे त्याचे नाव असून, त्याला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना कळवा येथे घडली. अरुण अलझेंडे असे मृताचे नाव आहे. ते चार मुलांसमोरच पत्नीला शिवीगाळ आणि मारहाण करत व तिच्या चारित्र्यावरही संशय घेत. त्यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून विष्णू आई व भावंडांसह मुंब्रा येथे राहू लागला. तरीसुद्धा वडील घरी येऊन शिवीगाळ आणि मारहाण करीत होते. मंगळवारी रात्री तो कळव्यातील वडिलांच्या घरी गेला. त्याने स्टील रॉडने त्यांच्या डोक्यात तीन ते चार वेळा प्रहार केला. त्यात वडिलांचा जागीच मृत्यू झाला. विष्णूने पोलीस ठाण्यात येऊन गुन्हा कबूल केला, अशी माहिती कळवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एम.एम. बागवान यांनी दिली.

Web Title: Mother killed by father of suspicion