दारिद्र्य रेषेखालील सर्वाधिक कुटुंब नाशकात
By Admin | Updated: April 19, 2017 02:35 IST2017-04-19T02:35:51+5:302017-04-19T02:35:51+5:30
राज्यभरातील सर्वाधिक बीपीएलधारक (दारिद्रयरेषेखालील) कुटुंब नाशिक जिल्हात असून, त्याखालोखाल नगर जिल्ह्याचा क्रमांक आहे.

दारिद्र्य रेषेखालील सर्वाधिक कुटुंब नाशकात
नवनाथ खराडे, अहमदनगर
राज्यभरातील सर्वाधिक बीपीएलधारक (दारिद्रयरेषेखालील) कुटुंब नाशिक जिल्हात असून, त्याखालोखाल नगर जिल्ह्याचा क्रमांक आहे. मात्र गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत नगरमधील बीपीएलधारक कुटुंबांची संख्या निम्म्याने घटली आहे. राज्यभरात सर्वांत कमी बीपीएलधारक वर्धा जिल्ह्यात आहेत.
राज्य शासनाच्या २०१५-१६ या वर्षातील आर्थिक पाहणी अहवालातील आकडेवारीनुसार राज्यभरात सर्वाधिक ७ लाख बीपीएलधारक कुटुंब नगर जिल्ह्यात होती. त्यामधून यंदा तब्बल ३ लाख बीपीएलधारक कमी झाले आहेत. २०१६-१७ वर्षाच्या आकडेवारीनुसार राज्यभरात सर्वाधिक बीपीएलधारकांची संख्या नाशिक जिल्ह्यात आहे. मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा नाशिकमध्ये बीपीएलधारक कुटुंबांची संख्या वाढली आहे. सद्य:स्थितीत नाशिकमध्ये ४ लाख ८४ हजार १७९ बीपीएलधारक, तर ६ लाख ९६ हजार ८५५ केशरी शिधापत्रिकाधारक आहेत. एकूण १२ लाख ६५ हजार ८३ शिधापत्रिकाधारक नाशिक जिल्ह्यात आहेत.