राज्यात सर्वात महाग पेट्रोल परभणीत; प्रति लीटर ८९ रुपये
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2018 04:02 IST2018-09-08T03:58:25+5:302018-09-08T04:02:37+5:30
सर्वात महाग पेट्रोल व डिझेल परभणीमध्ये आहे. तेथे पेट्रोल ८९.२४ व डिझेल ७५.९६ रुपये प्रति लीटर आहे. परभणीजवळ इंधनाचा कुठलाच डेपो नाही. त्यामुळे शहराला ३३० किमी दूर मनमाड डेपोतून इंधनाची आवक होते.

राज्यात सर्वात महाग पेट्रोल परभणीत; प्रति लीटर ८९ रुपये
मुंबई : सर्वात महाग पेट्रोल व डिझेल परभणीमध्ये आहे. तेथे पेट्रोल ८९.२४ व डिझेल ७५.९६ रुपये प्रति लीटर आहे. परभणीजवळ इंधनाचा कुठलाच डेपो नाही. त्यामुळे शहराला ३३० किमी दूर मनमाड डेपोतून इंधनाची आवक होते. त्याचा वाहतूक खर्च वाढत असल्याने इंधन महाग आहे.
पेट्रोल-डिझेल दरात शुक्रवारी ४६ पैसे व ५३ पैसे वाढ झाली. गेल्या १३ दिवसांत पेट्रोल २.२८ व डिझेल २.९९ रुपये प्रति लीटरने महाग झाले.
डिझेल दरवाढीने मालवाहतूक महागली आहे. त्यामुळे दैनंदिन गरजेचा भाजीपाला, धान्य यांची दरवाढ सुरू झाली आहे. भाज्या किलोमागे २० रुपयांनी महागल्या आहेत.
धान्याचे दरही किलोला १० रुपयांनी वाढले आहेत. स्कूल व्हॅनचालकांनी १०० रुपये भाडेवाढ जाहीर केली होती, पण डिझेल दरवाढ थांबत नसल्याने त्यांनी आणखी भाडेवाढीचा विचार सुरू केला आहे. बहुतांश आॅटोरिक्षा पेट्रोल व डिझेलवर चालतात. त्यामुळे त्यांनीही आता दरवाढ सुरू केली आहे.