शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

लय भारी! भवरलाल जैन यांच्या मोजेक पोर्ट्रेटची गिनिज बुकात नोंद; ९८ तासात १८ हजार चौरस फुटात साकारली कलाकृती

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2021 9:56 PM

जैन इरिगेशनचे संस्थापक भवरलाल जैन यांची जैन पाईप्सचा उपयोग करून प्रदीप भोसले यांनी साकारलेल्या मोजेक प्रकारातील पोर्ट्रेटची  गिनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

जळगाव : जैन इरिगेशनचे संस्थापक भवरलाल जैन यांची जैन पाईप्सचा उपयोग करून प्रदीप भोसले यांनी साकारलेल्या मोजेक प्रकारातील पोर्ट्रेटची  गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड प्रतिनिधींनी याची नोंद घेऊन भवरलाल जैन यांच्या  स्मृतीदिनाच्या पूर्वसंध्येलाजागतिक विक्रमाचे प्रमाणपत्र प्रदान केले. या कलाकृतीचे गुरुवारी लोकार्पण होणार आहे.

जैन इरिगेशनचे सहकारी प्रदीप भोसले यांनी जळगावातील जैन व्हॅली परिसरातील ‘भाऊंची सृष्टी’ येथे १५० फूट लांब व १२० फूट रुंद असे सुमारे १८ हजार चौरस फूट अशी भवरलाल जैन यांची भव्य मोजेक प्रकारातील कलाकृती साकारली. जागतिक नामांकन प्राप्त केलेली ही कलाकृती सलग ९८ तासात साकार झाली आहे. गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड प्रतिनिधींनीही याची नोंद घेतली. ही कलाकृती कायमस्वरूपी स्थापित करण्यात आली असून भाऊंच्या सृष्टीतील ‘भाऊंच्या वाटिके’त ती प्रेक्षकांसाठी उपलब्ध राहणार आहे.  

सात दिवस प्रत्येक दिवशी १४ तास कामकाळा, करडा, पांढरा या रंगांच्या पीई व पीव्हीसी पाईप्सचा उपयोग करून मनोहारी आणि भव्य कलाकृती साकारली आहे. भवरलाल जैन यांनी ज्या पाईप्सच्या माध्यमातून शेती केली आणि त्यांच्या कारकिर्दीचा पाया रचला त्या पाईप्सपासून मोजेक स्वरूपात ही कलाकृती साकार केली आहे. या पोर्ट्रेटसाठी पीई पाईप २५ मेट्रिक टन म्हणजेच नऊ हजार नग तर पीव्हीसी पाईप पाच मेट्रिक टन म्हणजेच एक हजार नग असे एकूण दहा हजार पाईप वापरण्यात आले. १६ ते २२ फेब्रुवारी दरम्यान सात दिवस प्रत्येक दिवशी १४ तास असे एकूण ९८ तास अर्थात पाच हजार ८८० मिनिट, ३ तीन लाख ५२ हजार ८०० सेकंदात या मोजेक स्वरूपाची कलाकृती साकारली. या कलाकृतीसाठी लागलेल्या पाईपची संख्या सरळ जोडणी केल्यास २१.९ किलोमीटर लांबीपर्यंत होऊ शकते.

असा झाला पोर्ट्रेटचा जागतिक विक्रम...गिनिज वर्ल्ड रेकॉर्डची नोंद करण्यासाठी विशिष्ट प्रोटोकॉल असतो. त्यानुसार ज्याठिकाणी विक्रम होत असतात अशा मोकळ्या जागेची निवड करण्यापासून तर ते पूर्ण होईपर्यंत व्हिडीओ चित्रण करण्यात येते. तसेच अशा प्रकारच्या विक्रमाची नोंद होताना तुकड्या तुकड्याने प्रत्येक व्हिडोओची बारकाईने नोंद घेण्यात येते. अशीच नोंद या पोर्ट्रेटसाठीसुध्दा घेण्यात आली. या जागतिक विक्रमाच्या नोंदीसाठी गिनिज वर्ल्ड रेकॉर्डच्यावतीने स्वप्नील डांगरीकर (नाशिक) व निखील शुक्ल (पुणे) या महाराष्ट्रातील प्रतिनिधींची नेमणूक करण्यात आली होती. गिनिज वर्ल्ड रेकॉर्डच्या प्रतिनिधींनी कोरोनामुळे ही पूर्ण कलाकृती ऑनलाईन पाहिली. याशिवाय गिनिज वर्ल्ड रेकॉर्डने जळगाव येथील आर्किटेक शिरीष बर्वे यांची सर्व्हेयर म्हणून नेमणूक केली होती. त्यांच्यासह प्राचार्य शिल्पा बेंडाळे, चित्रकार सचिन मुसळे हे या जागतिक विक्रमाचे साक्षीदार म्हणून गिनिज वर्ल्ड रेकॉर्डने नेमणूक केली होती. स्वप्नील डांगरीकर यांनी गिनिज वर्ल्ड रेकॉर्डचे प्रमाणपत्र प्रदान केले.

विश्वविक्रमी कलाकृती सदैव प्रेरणा देणारी- अशोक जैनकंपनीचे सहकारी प्रदीप भोसले यांच्यासह सहकाऱ्यांनी भवरलाल जैन यांच्या जन्मदिनी ही कलाकृती अनुभूती स्कूलच्या क्रीडांगणावर साकारली होती. ती कायमस्वरूपी जनतेला पाहण्यासाठी उपलब्ध व्हावी यादृष्टीने जैन व्हॅली परिसरातील भाऊंच्या सृष्टीतआता ही कलाकृती भव्य स्वरूपात साकारली आहे. गिनिज वर्ल्ड रेकॉर्डसाठी या कलाकृतीच्या माध्यमातून झालेला जागतिक विक्रम हा खरोखरच आनंददायी आहे. भवरलाल जैन यांच्या कार्यकर्तृत्वाची आठवण आणि प्रेरणा ही कलाकृती निरंतर देत राहिल, असे जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी या भावना व्यक्त केल्या.

टॅग्स :artकलाguinness book of world recordगिनीस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड