शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

तेव्हा नेतृत्व कोणाकडे होते हे अधिक महत्त्वाचे; अपात्रता सुनावणी, ठाकरे गटाचा युक्तिवाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2023 08:16 IST

उलटतपासणी नंतर दोन्ही बाजूच्या युक्तिवादाला सोमवारपासून सुरुवात झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राजकीय पक्ष कोणता, याचा निर्णय विधानसभा अध्यक्षांना आजच्या परिस्थितीवरून घेता येणार नाही, तर  मे आणि जून २०२२ मध्ये पक्षाचे नेतृत्व कुणाकडे होते, यावरुन पक्ष कुणाचा याचा निर्णय घ्यावा लागेल. त्यामुळे निवडणूक आयोगाने आता दिलेल्या निर्णयावर शिवसेना कुणाची याचा निर्णय घेता येणार नाही, असा दावा ठाकरे गटाकडून सोमवारी आमदार अपात्रतेच्या सुनावणीवेळी करण्यात आला.

उलटतपासणी नंतर दोन्ही बाजूच्या युक्तिवादाला सोमवारपासून सुरुवात झाली आहे. ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांच्याकडून पक्ष कोणाचा, व्हीप आणि गटनेतेपदाची नियुक्ती कशी अधिकृत होती, शेड्युल १० नुसार नेमकी काय कार्यवाही व्हायला हवी यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर कामत यांनी तब्बल सात तासांवर युक्तिवाद केला.

तोपर्यंत ठाकरे यांचेच नेतृत्व होते नेतृत्व सिद्ध करण्यासाठी  म्हणजे राजकीय पक्ष, विधीमंडळ पक्ष आणि घटनात्मक तरतूद हे तीन मार्ग आहेत. मात्र या विधीमंडळ सदस्यांनी वेगळाच मार्ग निवडला. आमच्या मते, एक गट शिवसेनेतून फुटून बाहेर पडला.  तोपर्यंत हा गट उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करत होता. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने प्राथमिक निरिक्षण नोंदवले आहे, असेही कामत म्हणाले.

तर शिवसेनेच्या सर्व आमदारांचे निलंबन शिवसेना नेतृत्वाची निवड पक्षाच्या घटनेला धरून नसल्याचा शिंदे गटाचा दावा मान्य केला तर शिवसेनेच्या सर्वच आमदारांना निलंबित करावे लागेल. कारण, एकनाथ शिंदे हे याच घटनाबाह्य पक्ष नेतृत्वाचे लाभार्थी आहेत. याच घटनाबाह्यांच्या नेतृत्वात सगळ्यांनी निवडणुका लढविल्या आणि आमदार बनले. त्यामुळे शिंदेंचा दावा मान्य केला तर सगळ्याच आमदारांना निलंबित करावे लागेल, असा युक्तिवाद कामत यांनी केला.

आणखी मुद्दे असे... विधिमंडळातील एक गट सांगतो, की आम्हीच राजकीय पक्ष आहोत. २००३ साली शेड्युल १०  तयार होताना जर गट बाहेर पडणार असेल तर त्यांना दुसऱ्या पक्षात विलीनीकरणाशिवाय पर्याय नाही. ‘पक्ष आमचा’, हे मैदानावरच्या घोषणांनी ठरत नाही तर पक्ष घटनेनुसार प्रतिनिधी सभा, राष्ट्रीय कार्यकारिणीत ठराव करावा लागतो पक्ष नेतृत्वातील बदल याच ठरावाने करता येतात. या ठरवाच्या आधारावर निवडणूक आयोग पक्ष नेतृत्वातील बदलाची नोंद घेत असल्याचे कामत यांनी स्पष्ट केले. शिवसेना पक्षाची २०१८  ची घटनादुरूस्ती किंवा पक्ष स्वतःच्या घटनेनुसार चालत नाही म्हणून त्याची मान्यता रद्द करण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाही नाही.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना