शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
4
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
5
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
6
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
7
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
8
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
9
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
10
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
11
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
12
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
13
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
14
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
15
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
16
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
17
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
18
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
19
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
20
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स

महिला व बाल विकास विभागाकडून मिळतोय ७० लाखांहून अधिक बालके, महिलांना आधार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2020 17:17 IST

राज्यामध्ये महिला व बाल विकास विभागाच्या सुमारे १ लाखांहून अधिक अंगणवाड्या

ठळक मुद्देअन्नधान्य, औषधे पुरविण्याबरोबरच प्रत्यक्ष किंवा ऑनलाईन माध्यमातून मार्गदर्शनअधिकारी, कर्मचारी, सेविका तत्पर

पुणे : लॉकडाऊनमुळे राज्यातील अंगणवाड्या बंद झाल्या असल्या तरी महिला व बाल विकास विभागाकडून ७० लाखांहून अधिक बालके, गर्भवती महिला, स्तनदा माता, निराधार बालके, महिला, भिक्षेकरी यांना मदतीचा हात दिला जात आहे. गरजेनुसार त्यांना अन्नधान्य, औषधे पुरविण्याबरोबरच प्रत्यक्ष किंवा ऑनलाईन माध्यमातून मार्गदर्शनही केले जात आहे. अधिकारी, कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स तसेच स्वयंसेवी संस्थाचा यामध्ये सक्रीय सहभाग आहे.राज्यामध्ये महिला व बाल विकास विभागाच्या सुमारे १ लाखांहून अधिक अंगणवाड्या आहेत. या अंगणवाड्यांमध्ये ७० लाखांहून अधिक सहा वर्षापर्यंतची बालके तसेच, किशोरवयीन मुली, गर्भवती महिला व स्तनदा माता यांची नोंदणी आहे. तसेच बालकांच्या ३६६ व महिलांच्या १६३ निवासी संस्थांमध्ये अनुक्रमे १० हजार ६६४ व १ हजार ६३४ प्रवेशित आहेत. एकुण १४ भिक्षेकरी गृहांमध्ये ३५० जण आहेत. अंगणवाड्यांमध्ये मुलांना पुर्व प्राथमिक शिक्षण देण्याबरोबरच त्यांच्या पोषणासाठीही प्रयत्न केले जातात. मुली व महिलांना आरोग्यविषयक मार्गदर्शन केले जाते. औषधांचा पुरवठा, लसीकरणाची जबाबदारीही आरोग्य विभागाच्या मदतीने पेलली जाते. लॉकडाऊनमुळे अंगणवाड्या बंद असल्या तरी या सेवा मात्र बंद झालेल्या नाहीत. विभाग व स्वयंसेवी संस्थाचे सुमारे ७ हजार अधिकारी-कर्मचारी आणि एक लाखांहून अधिक अंगणवाडी सेविका इतर विभागांच्या सहकार्याने बालके व महिला तसेच निराधारांना गरजेनुसार सेवा देत आहेत. त्यासाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी पालक, महिलांचे व्हाट्स अप ग्रुप तयार केले असून त्यावर लिखित किंवा व्हिडिओ स्वरूपात माहिती पाठविली जात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.निवासी संस्थांमधील दाखल सर्वजण निराधार आहेत. तिथे सॅनिटायझर, निर्जुंतुकीकरण, अन्नधानय, कपडे, स्वच्छता, विलगीकरण कक्षा या सर्व सुविधा दिल्या जात आहेत. संस्थांमधील बहुतेक जण उपेक्षित घटकांतील असून आजारी, वयस्कर, कमी वजनाचे, अंपग, मानसिक विकार असलेले, अशक्त असल्याने त्यांना कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका अधिक आहे. पण त्यांची योग्यप्रकारे काळजी घेतली जात असल्याने अद्याप या संस्थांमध्ये कोरोनाचा शिरकाव झालेला नाही, असे अधिकाऱ्यांनी नमुद केले.-----------------कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनाही अनेक ठिकाणी घडत आहेत. विभागाचे संरक्षण अधिकारी मोबाईलच्या माध्यमातून त्यासंदर्भात मार्गदर्शन करत आहेत. याशिवाय देहविक्री करणाऱ्या महिला, रेशनकार्ड नसलेल्या महिलांना स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने रेशन कीट दिले जात आहे. स्थलांतरीतांच्या निवारा केंद्रांतील महिला व मुलांचे समुपदेशन केले जात आहे. शहरी, ग्रामीण तसेच आदिवासी भागातही हे काम सुरू आहे.------------------

टॅग्स :Puneपुणेwomen and child developmentमहिला आणि बालविकासState Governmentराज्य सरकारCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस