शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

विसर्जनाला गालबोट, राज्यभरात गणेश विसर्जन सोहळ्यादरम्यान बुडून 15 हून अधिक जणांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2017 22:50 IST

राज्यात एकीकडे गणपती बाप्पांना भावपूर्ण वातावरणात निरोप देत असतानाचा, दुसरीकडे विसर्जन सोहळ्यादरम्यान राज्यातील विविध भागात पाण्यात बुडून 15 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे विसर्जनाच्या सोहळ्याला गालबोट लागले आहे.

मुंबई, दि. 5  - राज्यात एकीकडे गणपती बाप्पांना भावपूर्ण वातावरणात निरोप देत असतानाचा, दुसरीकडे विसर्जन सोहळ्यादरम्यान राज्यातील विविध भागात पाण्यात बुडून 15 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे विसर्जनाच्या सोहळ्याला गालबोट लागले आहे.   औरंगाबादेतील बिडकीनजवळ शिवनाई तलावात बुडून तीन मुलांचा मृत्यूऔरंगाबाद शहरात गणपती बाप्पाच्या विसर्जनाला गालबोट लागलं आहे. औरंगाबादेतील बिडकीनजवळ शिवनाई तलावात बुडून तीन लहानग्यांचा मृत्यू झाला आहे. गणपती विसर्जनासाठी ही लहान मुले गेली असताना ही दुर्घटना घडली आहे. आज दुपारी 3 वाजताच्या दरम्यान ही मुलं बिडकीनजवळील शिवनाई तलावात विसर्जनासाठी गेली होती. तर औरंगाबादमधील दौलताबाद तलावात बुडून युवकाचा मृत्यू झाला, आकाश साठे असे या मुलाचे नाव होते.  पिंपरी-चिंचवडमधील वाकडमध्ये मुळा नदीत दोन मुले बुडालीपिंपरी-चिंचवड शहरातील वाकड कस्पटे वस्ती येथील मुळा नदीत दुपारी साडे तीनच्या सुमारास दोन मुलं बुडाल्याची माहिती मिळते आहे. दुपारपासून पिंपरी चिंचवड फायर ब्रिगेडच्या जवानांकडून या दोन मुलांचा शोध सुरू आहे. तसंच वाकड सांगवी पोलिस देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत. मुळा नदीत बुडालेली ही मुलं गवत आणि गाळात रुतल्याची भीती व्यक्त होत आहे.  मुळा नदीत बुडालेल्या सोनाजी धनाजी शेळके (वय १६, जिनतुर, परभणी) आणि रखमाजी सुदामराव वारकड (१७ पाटोडा परभणी) अशी दोघांची नावे आहेत.  पुण्यात 2 तरुण वडकी तलावात बुडाले पुण्यातील वडकी येथील  तलावात दोन मुले गणपती विसर्जन करतांना बुडाली. रोहित संतोष जगताप व ओमकार संतोष जगताप अशी या दोन भावंडांची नावे आहेत त्यापैकी एकाचा मृतदेह सापडलेला असून दुसरा अद्यापही पाण्यात अडकलेला आहे. हा तलाव वडकी परिसरातील आहे.नाशिकमध्येही विसर्जनाला गालबोट   नाशिकरोड चेहेडी पंपिग स्टेशन बंधारा येथे दुपारी विसर्जजनासाठी आलेला युवक भाविक किशोर कैलास सोनार याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. तर  विसर्जनावेळी डबक्यात बुडून तरुणाचा मृत्यू, मुंगसरे गावाजवळ गणेश मराळेचा मृ्त्यू झाला.  बीडमध्ये विसर्जन करत असताना बीडमध्ये एकाचा मृत्यू बीडमधील माजलगाव  तालुक्यात एकाचा मुलाचा नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाला. येथे गणेश  विसर्जन करीत असताना सरस्वती नदीत पांडुरंग  महादेव  घायतिडक  हा मुलगा गेला तो वर आलाच नाही. पाण्यात शोधत असताना त्याचा मृतदेह सापडला.   नगरमध्ये एकाचा मृत्यू अहमदनगरमधील संगमनेरमधील प्रवरा नदीच्या गंगामाई घाटात गणेश विसर्जन करताना एका तरुणाचा पाण्यात बुडुन मृत्यू झाला. 

जळगावमध्ये दोन जणांचा मृत्यू 

जळगावमधील शेंदुर्णी ( जामनेर ) येथे घरगुती गणपती विसर्जन करण्यासाठी शामसिंग बुवा धरणात काही युवक गेले. गणपती विसर्जन करतांना बांधावरून पाय घसरला. त्यावेळी त्यांना बुडतांना पाहील्यावर वाचवण्यासाठी काही युवकांनी प्रयत्न केला.परंतू शामसिंग बुवा धरण मध्ये विहरीत बुडून मृत्यू पावले. जीवन ( सागर ) संतोष धनगर ( वय १८ )  व योगेश पुना धनगर ( वय १९ ) या युवकांचा बुडून मृत्यू झाला.

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सवAccidentअपघात