स्नॅपडीलवर 16 तासांत 11 लाखांहून अधिक मोबाईल बुक
By Admin | Updated: October 3, 2016 21:33 IST2016-10-03T21:33:06+5:302016-10-03T21:33:06+5:30
स्नॅपडीलसारख्या ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट्सनी ग्राहकांसाठी खरेदीवर सवलत दिल्यानं या साइट्सवर खरेदीदार अक्षरशः तुटून पडले आहेत

स्नॅपडीलवर 16 तासांत 11 लाखांहून अधिक मोबाईल बुक
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 3 - फ्लिपकार्ट, अॅमेझॉन आणि स्नॅपडीलसारख्या ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट्सनी ग्राहकांसाठी खरेदीवर सवलत दिल्यानं या साइट्सवर खरेदीदार अक्षरशः तुटून पडले आहेत. यात स्नॅपडीलनं आघाडी घेत एक नवा विक्रम केला आहे.
स्नॅपडील कंपनीच्या दिवाळीसाठी असलेल्या ऑफरमध्ये 16 तासांत 11 लाखांपेक्षा अधिक ग्राहकांनी मोबाईल फोन बुक केला आहे. त्यामुळे स्नॅपडीलवर जवळपास 1 लाख मोबाईल फोनची विक्री झाली आहे, अशी माहिती स्नॅपडील या कंपनीकडून देण्यात आली आहे.
स्नॅपडीलच्या ऑफरमध्ये सॅमसंग जे 2 आणि LeEco Le मॅक्स 2 या मोबाईल फोनला सर्वाधिक पसंती मिळाली आहे. मोबाईलप्रमाणेच इतर इलेक्ट्रॉनिक आणि फर्निचरसारख्या वस्तूंनाही मोठ्या प्रमाणात मागणी मिळत आहे.