आशा स्वयंसेविकांतर्फे दरमहा मानधनाची मागणी
By Admin | Updated: July 4, 2014 00:05 IST2014-07-03T23:25:22+5:302014-07-04T00:05:28+5:30
आरोग्य सेविकांना राज्यशासनाने दरमहा निश्चित मानधन देण्याची मागणी केली आहे.

आशा स्वयंसेविकांतर्फे दरमहा मानधनाची मागणी
वाशिम: राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाअंतर्गत आरोग्य विभागात आशा स्वयंसेविका म्हणून काम करणार्या आरोग्य सेविकांना राज्यशासनाने दरमहा निश्चित मानधन देण्याची मागणी जिजाऊ ब्रिगेड आशा स्वयंसेविका महासंघाने राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अर्थमंत्री अजीतपवार, आरोग्य मंत्री, जितेंद्र आव्हाड, आयुक्त कुटूंब कल्याण तथा अभियान संचालक, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान महाराष्ट्र राज्य यांना पाठविलेल्या निवेदनात केली आहे.
जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष संजीवनी बाजड व महासंघाच्या राज्य निमंत्रक वनमापला शेळके यांच्या नेतृत्वात सोमवारी ३0 जून रोजी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनामध्ये आशा स्वयंसेविकांना दरमहा निश्चित असे सहा हजार रुपये मानधन दयावे, स्वयंसेविकांचे प्रशिक्षण एकाच टप्प्यात पूर्ण करावे, भविष्यासाठी तरतूद म्हणूान मोफत विमा योजना लागू करावी, वरिष्ठांसोबत व रुग्णांशी संपर्कासाठी मोबाईल भत्ता देण्यात यावा या स्वरुपाच्या मागण्या यावेळी करण्यात आल्या निवेदन देताना जिजाऊ ब्रिगेडच्या शहराध्यक्षा वैशाली बुंधे सह स्वाक्षरी करणार्या आशा स्वयंसेविका महासंघ जिल्हाध्यक्षा ज्योतीताई संतोषराव वाघ, उपाध्यक्ष गोदावरी गजानन बांगर, सचिव रंजना संजय सोनुने, तालुकाध्यक्ष छाया सुनिल भगत, निर्मला प्रकाश वाकुडे, नीता दशरथ राठोड यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठया प्रमाणात उपस्थिती होती.