एप्रिलमध्ये साडेचार हजार हेक्टर क्षेत्र अवकाळीचे बळी

By Admin | Updated: May 7, 2014 21:36 IST2014-05-07T20:35:33+5:302014-05-07T21:36:35+5:30

राज्यात अवकाळी पावसाचे सत्र एप्रिल महिन्यातही कायम राहिले असून, १५ जिल्हे त्यामुळे बाधित झाले आहेत.

In the month of April, the deadline of 4.5 thousand hectare area was sacrificed | एप्रिलमध्ये साडेचार हजार हेक्टर क्षेत्र अवकाळीचे बळी

एप्रिलमध्ये साडेचार हजार हेक्टर क्षेत्र अवकाळीचे बळी

पुणे : राज्यात अवकाळी पावसाचे सत्र एप्रिल महिन्यातही कायम राहिले असून, १५ जिल्हे त्यामुळे बाधित झाले आहेत. या जिल्ह्यांतील डाळिंब, आंबा, केळे व भाजी पीकाचे तब्बल ४ हजार ४१६ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे.
जळगाव जिल्ह्यातील सर्वाधिक ९२६ हेक्टर क्षेत्राला अवकाळीचा फटका बसला आहे. सांगली जिल्ह्यातील ८८०, सोलापुर ७००, उस्मानाबाद, जालना प्रत्येकी ५००, ठाणे २३९, पुणे ११९, नगर ११८, सातारा ७६, कोल्हापुर २०, औरंगाबाद १६५, बीड १४५, बुलडाणा २३९, रत्नागिरीतील ६ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. त्यात डाळिंब, आंबा, केळे, द्राक्ष, टोमॅटो, वांगी, कारली अशा विविध फळभाज्या, पालेभाज्या व फुल पीकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. गेले तीन-चार दिवस राज्यातील पुणे, कोल्हापुर, पोलादपुर, नगर भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. पोलादपुर भागात वादळी वार्‍याने देखील काही प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र त्याची आकडेवारी समजू शकली नाही.
अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे बाधित झालेल्या शेतकर्‍यांना १३९० कोटी रुपये नुकसानभरापई मंजुर झाली असून, त्या पैकी १३५० कोटी रुपयांचे एप्रिल अखेर वाटप झाले होते. तसेच विशेषबाब म्हणून आणखी अडीचहजार कोटी रुपयांची मदत शेतकर्‍यांना देण्यात येणार आहे.
 

Web Title: In the month of April, the deadline of 4.5 thousand hectare area was sacrificed