मान्सून 2-3 दिवसांत कोकणात येणार

By Admin | Updated: June 11, 2014 03:02 IST2014-06-11T03:02:15+5:302014-06-11T03:02:15+5:30

गेल्या काही दिवसांपासून सर्वजण वाट पाहात असलेला नैर्ऋत्य मोसमी पाऊस (मान्सून) महाराष्ट्रात दाखल होण्यासाठी सिद्ध झाला आहे.

Monsoon will arrive in Konkan in 2-3 days | मान्सून 2-3 दिवसांत कोकणात येणार

मान्सून 2-3 दिवसांत कोकणात येणार

>पुणो : गेल्या काही दिवसांपासून सर्वजण वाट पाहात असलेला नैर्ऋत्य मोसमी पाऊस (मान्सून) महाराष्ट्रात दाखल होण्यासाठी सिद्ध झाला आहे. पुढील 2 ते 3 दिवसांत तो कोकण आणि गोव्यामध्ये दाखल होईल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. दरम्यान, मंगळवारी मान्सूनने आगेकूच केली आणि तो नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश या राज्यांमध्ये आणि पश्चिम बंगाल व सिक्कीम राज्यांच्या काही भागांत पोहोचला.
अरबी समुद्राच्या मध्यामध्ये हवेचा कमी दाबाचा पट्टा गेल्या दोन दिवसांपासून सक्रिय झाल्याने महाराष्ट्रात मान्सून येण्यासाठी अटकाव होत होता. मात्र  तो पट्टा विरून जाण्याची शक्यता आहे. तो विरताच मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्यासाठी सज्ज होणार आहे.

Web Title: Monsoon will arrive in Konkan in 2-3 days