शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

Monsoon News: परतीचा पाऊस वेशीवर, दोन दिवस जोर‘धार’

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2021 07:30 IST

Monsoon News: राजस्थानातून परतीच्या वाटेवर निघालेल्या मान्सूनचा मुक्काम रविवारीदेखील गुजरात, मध्य प्रदेशात नोंदविण्यात आला असून, वेशीवर असलेला मान्सून येत्या ४८ तासांत महाराष्ट्रात दाखल होईल, असा अंदाज आहे.

मुंबई : राजस्थानातून परतीच्या वाटेवर निघालेल्या मान्सूनचा मुक्काम रविवारीदेखील गुजरात, मध्य प्रदेशात नोंदविण्यात आला असून, वेशीवर असलेला मान्सून येत्या ४८ तासांत महाराष्ट्रात दाखल होईल, असा अंदाज आहे. पूर्व-मध्य अरबी समुद्रातील हवामानात उल्लेखनीय बदल होत असून, याचा परिणाम म्हणून सोमवार आणि मंगळवारी राज्यात बहुतांश ठिकाणी पावसाचा जोर कायम राहील, अशी शक्यताही वर्तविली आहे. 

कुठे, किती तीव्रता राहणार?११ ऑक्टोबर : कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होईल. विदर्भात मात्र हवामान कोरडे राहील.१२ ऑक्टोबर : कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होईल. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस होईल. विदर्भात हवामान कोरडे राहील.१३ आणि १४ ऑक्टोबर : कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचे प्रमाण बऱ्यापैकी कमी होईल. 

पुणे, नगरमध्ये तासात विक्रमी पाऊस-पुणे शहरात शनिवारी सायंकाळी ढगफुटीसारखा पाऊस पडला. ऑक्टोबर महिन्यात जितका पाऊस होतो, तेवढा एकाच दिवसात पडला. -अहमदनगर शहर व परिसरात शनिवारी ४० मिनिटांत ८० मिमी पाऊस पाऊस झाला. नेवासा तालुक्यात वीज पडून एकाचा मृत्यू झाला, तर राहुरी तालुक्यात वीज पडून दोघे जखमी झाले.-भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या  माहितीनुसार, गेल्या २४ तासांत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली.

टॅग्स :RainपाऊसMaharashtraमहाराष्ट्र