शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

मान्सूनचा विलंब..शेतकऱ्यांची धडकी भरविणारा...!  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2019 18:48 IST

दुष्काळात होरपळत असलेल्या व पाणीटंचाई ग्रासलेल्या देशवासियांच्या चिंतेत भर घालणारा अंदाज बुधवारी हवामान विभागाने वर्तविला आहे़.

ठळक मुद्देकेरळमध्ये ५ दिवस उशिरा येणार : ६ जूनला आगमन मान्सून दाखल होण्यापूर्वी तो जवळपास १५ दिवस अगोदर अंदमानात मान्सूनच्या आगमनाचा अंदाज व्यक्त करण्यासाठी हवामान विभागाकडून ६ घटकांचा विचार

पुणे : दुष्काळात होरपळत असलेल्या व पाणीटंचाई ग्रासलेल्या देशवासियांच्या चिंतेत भर घालणारा अंदाज बुधवारी हवामान विभागाने वर्तविला आहे़. मॉन्सून यंदा ५ दिवस उशिरा ६ जून रोजी केरळ दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे़. स्कायमेटने मंगळवारी मान्सूनचे आगमन ४ जून रोजी होईल असा अंदाज व्यक्त केला होता़. मान्सून मॉडेलनुसार त्यात चार दिवस पुढे मागे होण्याची शक्यता गृहीत धरण्यात आली आहे़.  साधारणपणे ३० मे ते १ जून ही केरळमध्ये मान्सूनच्या आगमनाची तारीख गृहीत धरली जाते़. अल निनोचा प्रभाव असल्याने यंदा मान्सूनवर परिणाम होण्याचा अंदाज व्यक्त केला जात होता़. हवामान विभागाने आज जाहीर केलेल्या अंदाजातून ते प्रतित होत आहे़. याअगोदर हवामान विभागाने यंदा सरासरीच्या ९६ टक्के पावसाचा दीर्घकालीन अंदाज जाहीर केला आहे़. मान्सून आगमानाबद्दलचे १४ वर्षातील १३ अंदाज खरे ठरल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे़. केवळ २०१५ मध्ये अंदाज चुकला होता़. २०१५ मध्ये हवामान विभागाने ३० मे रोजी मान्सून केरळमध्ये येईल, असा अंदाज व्यक्त केला होता़. मात्र, मान्सून ५ जून रोजी केरळमध्ये दाखल झाला होता़. केरळमधील मान्सूनच्या आगमनाचा अंदाज व्यक्त करण्यासाठी हवामान विभागाकडून  ६ घटकांचा विचार केला जातो़. उत्तर- पश्चिम भारतातील किमान तापमान, दक्षिण द्वीपसमूह, दक्षिण भारतातील पूर्व मॉन्सून पाऊस, दक्षिण चीन सागरावरील उष्णतेचे होणारे उत्सर्जन, दक्षिणपूर्व भारतीय महासागरावरील वाऱ्यांची दिशा, पूर्वेकडील भूमध्य सागरीय भागावरील उष्णतेचे होणारे उत्सर्जन, दक्षिण -पश्चिम पॅसिफिक क्षेत्रावरील उष्णतेचे होणारे उत्सर्जन अशा सहा घटनांचा विचार करुन केरळमध्ये मॉन्सून कधी येणार याचा अंदाज जाहीर केला जातो़. केरळमध्ये मान्सून दाखल होण्यापूर्वी तो जवळपास १५ दिवस अगोदर त्याचे अंदमानच्या समुद्रात आगमन होत असते़. दरवर्षी साधारण १५ ते १६ मे दरम्यान मान्सूनचे आगमन अंदमानच्या समुद्राजवळ होत असते़. यंदा मात्र, अंदमानच्या समुद्रातील काही भाग निकोबार बेट आणि परिसरात १८ -१९ मे रोजी मान्सून दाखल होण्याच्या दृष्टीने अनुकुल वातावरण निर्माण झाले आहे़. ़़़़़़़़़़मागील पाच वर्षातील केरळमधील मान्सूनचे आगमनवर्ष        प्रत्यक्ष आगमन    हवामान विभागाचा अंदाज२०१४    ६ जून        ५ जून२०१५    ५ जून        ३० मे२०१६    ८ जून        ७ जून२०१७    ३० मे        ३० मे२०१८    २९ मे        २९ मे२०१९            ६ जूऩ़़़़़़़़़़़़़

टॅग्स :PuneपुणेweatherहवामानRainपाऊस