पॉर्न फिल्म दाखवल्यानंतर बलात्कार करून मोनिक घुरडेचा खून - आरोपीची कबुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2016 09:32 IST2016-10-12T06:18:39+5:302016-10-12T09:32:34+5:30
पर्फ्युम स्पेशलिस्ट मोनिका घुरडे हिचा खून करण्यापूर्वी राजकुमार सिंगने तिच्यावर हात बांधलेल्या स्थितीत बलात्कारही केल्याचे तपासातून उघड

पॉर्न फिल्म दाखवल्यानंतर बलात्कार करून मोनिक घुरडेचा खून - आरोपीची कबुली
पणजी : पर्फ्युम स्पेशलिस्ट मोनिका घुरडे हिचा खून करण्यापूर्वी राजकुमार सिंगने तिच्यावर हात बांधलेल्या स्थितीत बलात्कारही केल्याचे तपासातून उघड झाले. मोनिकामुळेच आपल्याला कामावरून काढल्याचा त्याचा समज झाल्यामुळे सूड भावनेने त्याने हे केल्याची कबुली दिली.
वैद्यकीय तपासात मोनिकावर बलात्कार झाला की नाही, याबद्दलचा अहवाल उघड करण्यात आलेला नसला, तरी खुनापूर्वी तिच्यावर बलात्कार केल्याचे संशयिताने पोलिसी इंगा दाखविल्यानंतर कबूल केले. ५ आॅक्टोबरला संध्याकाळी ६.३० वाजेच्या सुमारास संशयिताने मोनिकाच्या फ्लॅटची बेल वाजविली. ‘कोण आहे,’ असे मोनिकाने विचारताच, ‘सिक्युरिटी’ असे त्याने उत्तर दिले. त्यामुळे मोनिकाने दरवाजा उघडला. दरवाजा उघडताच राजकुमार घरात घुसला आणि चाकू काढून त्याने तिला धाक दाखविला. गळा कापण्याची धमकी दिली आणि नंतर तिचे हात आणि पाय बांधून ठेवले. तिने प्रतिकार थांबविल्यानंतर तिच्याकडे पैसे मागितले. तिच्या पर्समध्ये केवळ साडेचार हजार रुपयेच होते आणि त्याची मागणी मोठी होती. त्यामुळे आपले एटीएम कार्ड तिने त्याला नेण्यास सांगितले. त्याने एटीएम कार्डसह मोबाइल फोनही घेतला आणि एटीएमचा आणि मोबाइलचा पासवर्डही घेतला.
तिला सोडून दिले, तर ती पोलिसांत तक्रार नोंदवेल, या भीतीनेच त्याने तिच्या चेहऱ्यावर उशी दाबून तिचा खून केला. तत्पूर्वी तिच्यावर बलात्कार केला. बलात्कार करण्यापूर्वी मोबाईलवरील ब्ल्यू फिल्म त्याने तिला सक्तीने पाहायला लावल्या, अशी माहिती पोलीस उपमहानिरीक्षक विमल गुप्ता यांनी दिली. (प्रतिनिधी)