पैशाच्या हव्यासापोटी मित्रानेच केला खून
By Admin | Updated: January 21, 2017 01:19 IST2017-01-21T01:19:42+5:302017-01-21T01:19:42+5:30
मित्राने पैशाच्या हव्यासापोटी धारदार शस्त्राने डोक्यात वार करून निर्घृण खून केल्याची घटना उघड झाली आहे.

पैशाच्या हव्यासापोटी मित्रानेच केला खून
वालचंदनगर (वार्ताहर) : इंदापूर तालुक्यातील लाकडी येथे संतोष जगताप या टेम्पोचालकाचा त्याच्याच मित्राने पैशाच्या हव्यासापोटी धारदार शस्त्राने डोक्यात वार करून निर्घृण खून केल्याची घटना उघड झाली आहे. वालचंदनगर पोलिसांनी संदीप भिसे या आरोपीच्या मुसक्या आवळल्या.
वालचंदनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष जगताप (रा. ढेकळवाडी) हा शुक्रवारी (दि. १३) सांगली जिल्ह्यात पाण्याचे बॉक्स पोहचविण्यासाठी गेला होता. त्या वेळी संतोष याच्याकडे पाण्याचे ५० हजार रुपये आले होते. दुसऱ्या दिवशी कामावर जाताना त्याला त्याच्याच कंपनीत कामाला असणारा संदीप भिसे (रा. काटेवाडी, ता. बारामती) काटेवाडी येथे भेटला. पैशासाठी संतोषच्या डोक्यात
वार करून खून केला. त्याच्याकडील पैसे घेऊन तो पसार झाला. या घटनेचा तपास पोलीस उपअधीक्षक तानाजी चिखले व बारामतीचे उपविभागीय पोलीस अधिकारी बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक उत्तम भजनावळे यांनी अल्प कालावधीत खुनाचा तपास करून आरोपीला अटक केली आहे.