पोलिसांना चिमुकलीच्या बयाणाची वाट

By Admin | Updated: August 26, 2014 00:57 IST2014-08-26T00:57:37+5:302014-08-26T00:57:37+5:30

चिमुकलीवरील अत्याचार प्रकरणातील वास्तव पुढे आणण्यासाठी आता पोलिसांना पीडित चिमुकलीच्या बयाणाची वाट आहे. चिमुकली शुद्धीवर आली असली तरी ती बयाण देण्याच्या मनस्थितीत

Mom's way to the police | पोलिसांना चिमुकलीच्या बयाणाची वाट

पोलिसांना चिमुकलीच्या बयाणाची वाट

तपासाला नवी दिशा : आरोपींच्या संख्येबाबत संभ्रम
वर्धा : चिमुकलीवरील अत्याचार प्रकरणातील वास्तव पुढे आणण्यासाठी आता पोलिसांना पीडित चिमुकलीच्या बयाणाची वाट आहे. चिमुकली शुद्धीवर आली असली तरी ती बयाण देण्याच्या मनस्थितीत नसल्याची माहिती पोलीस सूत्राने दिली.
चिमुकलीवर अत्याचार झाल्यानंतर तिच्या काकानेच तिला रुग्णालयात नेले. यामुळे नेमका आरोपी कोण, याबाबत पोलिसांची चांगलीच गफलत झाली. उल्लेखनीय म्हणजे तिचे वडील, आजी आणि आजोबाही तिच्या काकाचे नाव न घेता दुसऱ्यावरच संशय व्यक्त करीत होते. ‘लोकमत’ने या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे या प्रकरणाला नवे वळण मिळाले. सुरुवातीला ‘त्या’ वस्तीतील नागरिकही याप्रकरणाबाबत मौन बाळगून होते. अखेर वाढता दबाब लक्षात घेता तेथील नागरिकांकडूनच मुलीच्या काकाकडे संशयाची सुई वळली. मात्र आता पोलीस आपल्याला अटक करतील, ही भीती लक्षात येताच पीडितेचा काका पत्नीला घेऊन पसार झाला आहे. त्याला अटक करण्यासाठी पोलिसांनी सापळा रचल्याची माहिती पोलीस सूत्राने दिली. याप्रकरणात आरोपींची संख्या एकापेक्षा अधिक असावी, असा संशय आहे. वैद्यकीय अहवालातूनही याकडे लक्ष वेधल्या गेले आहे. मात्र ही बाब उघडकीस आणण्यासाठी पीडितेचे बयाण महत्त्वाचा पुरावा ठरणार आहे.
घटनेनंतर पीडितेवर शस्त्रक्रिया करण्यात आली. यामुळे तिची प्रकृती धोक्याबाहेर असली तरी ती बयाण देण्याच्या मनस्थितीत नाही. यामुळे तिच्या प्रकृतीत सुधारणा होण्याची वाट पोलिसांना आहे. या प्रकरणाच्या तपासाकडे आता राज्यभरातील जनतेचे लक्ष लागले आहे. या प्रकरणाच्या तपासात पुढे काय निष्पन्न होते, याकडे प्रशासन आणि सामाजिक संघटनांचेही लक्ष लागले आहे.(जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Mom's way to the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.