अश्लील क्लीप पाठवून विनयभंग

By Admin | Updated: November 5, 2016 03:43 IST2016-11-05T03:43:34+5:302016-11-05T03:43:34+5:30

कळवा येथील तरुणीला मोबाइलवर अश्लील व्हिडीओ क्लिप पाठवून तिचा विनयभंग केल्याचा प्रकार रोहित शिंदे याने केला

Molestation by sending porn clip | अश्लील क्लीप पाठवून विनयभंग

अश्लील क्लीप पाठवून विनयभंग


ठाणे: कळवा येथील तरुणीला मोबाइलवर अश्लील व्हिडीओ क्लिप पाठवून तिचा विनयभंग केल्याचा प्रकार रोहित शिंदे याने केला. याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही २८ वर्षीय तरुणी तिच्या कळव्यातील घरी असताना तिला २५ आॅक्टोबर २०१६ रोजी सकाळी ९ वा. च्या सुमारास रोहितने व्हॉटसअ‍ॅपवर अश्लील क्लिप पाठविली. याप्रकरणी तिने ३ नोव्हेंबर रोजी त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. याप्रकरणी चौकशी सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याने आणखी कोणाला अशाप्रकारे त्रास दिला आहे का किंवा छेडछाडीचा प्रयत्न केला आहे का याचीही चौकशी पोलिसांकडून केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. (प्रतिनिधी)

Web Title: Molestation by sending porn clip