कांदिवलीत चिमुरडीचा शिक्षकाकडून विनयभंग
By Admin | Updated: December 8, 2014 03:05 IST2014-12-08T03:05:13+5:302014-12-08T03:05:13+5:30
कांदिवली पश्चिम येथील पवार पब्लिक स्कूलमध्ये ५ वर्षांच्या विद्यार्थिनीचा शाळेत नृत्य शिकवणाऱ्या शिक्षकाने विनयभंग केला.

कांदिवलीत चिमुरडीचा शिक्षकाकडून विनयभंग
मुंबई: कांदिवली पश्चिम येथील पवार पब्लिक स्कूलमध्ये ५ वर्षांच्या विद्यार्थिनीचा शाळेत नृत्य शिकवणाऱ्या शिक्षकाने विनयभंग केला. ५ नोव्हेंबरला त्या विद्यार्थिनीचा वाढदिवस होता़ त्यामुळे शाळेत शिक्षकांना ती चॉकलेट वाटत होती. आरोपी शिक्षकालाही ती चॉकलेट देण्यासाठी गेली असता त्याने तिच्याशी अश्लील वर्तन केले.
पीडित मुलीने घरी जाऊन आपल्या आईला घडलेला सगळा प्रकार सांगितला. या प्रकारानंतर मुलीच्या आईने मुलीसह शाळेत धाव घेतली. शाळेतील मुख्याध्यापिकांना घडलेला प्र्रकार सांगितला. त्यानंतर मुलीच्या पालकांनी कांदिवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मुलीच्या पालकांंनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी तक्रार नोंदवून घेत शुक्रवारी रात्री या आरोपी शिक्षकाला अटक केली.
शनिवारी त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. याप्रकरणी अॅड. अविशा कुलकर्णी यांनी न्यायालयात धाव घेतली असता, न्यायालयाने शिक्षकाच्या पोलीस कोठडीत वाढ केली. (प्रतिनिधी)