शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
2
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
3
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
4
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
5
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
6
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
7
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
8
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
9
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
10
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
Daily Top 2Weekly Top 5

"गबरू जवानाने किती साखर खाल्ली..." मोहित कंबोज यांचा रोहित पवारांवर अप्रत्यक्ष निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2022 18:40 IST

रोहित पवार संचालक राहिलेल्या ग्रीन एकर कंपनीने आर्थिक घोटाळा केल्याची तक्रार ईडीला प्राप्त झाली असून या संदर्भात ईडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

मुंबई- राष्ट्रवादीचे नेते व आमदार रोहित पवार (Rahit Pawar) हे संचालक राहिलेल्या ग्रीन एकर कंपनीने आर्थिक घोटाळा केल्याची तक्रार ईडीला (सक्तवसुली संचालनालय) प्राप्त झाली असून या संदर्भात ईडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या संदर्भात लवकरच प्राथमिक चौकशी होईल. दरम्यान, यावरुन आता भाजप नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी एक ट्विट करुन रोहित पवारांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. त्यांच्या या ट्विटचा रोख थेट रोहित पवार यांच्याकडेच असल्याचे दिसून येत आहे. 

ईडीच्या रडारवर आलेले रोहित पवार कधीकाळी ग्रीन एकर कंपनीचे संचालक होते. याच कंपनीची आता ईडीकडून चौकशी करण्यास सुरुवात झाली आहे. यावर बोलताना भाजप नेते मोहित कंबोज म्हणतात, ''भेटा भारताच्या जेफ बेजोसला, 2006 मध्ये या 21 वर्षीय गबरू जवानाने ग्रीन एकर रिसोर्ट अंतर्गत प्लास्टिक, हीरे, गोल्ड, बिल्डर, इक्स्पॉर्ट, इंपोर्ट, दारू ते चड्डी बनवण्याचे स्टार्टअप सुरू केले. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डला माझी विनंती आहे की, यांचे नाव तुमच्या रेकॉर्डमध्ये टाका.''

''गबरू जवानाचे बिझनेस मॉडेलमध्ये महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटीव्ह बॅंकेला 1 हजार कोटींचे नुकसान झाले आहे. याच बॅंकेने एका साखर कारखान्याला कोट्यवधी रुपये कर्ज दिले. साखर कारखान्याने पैसे गडप केले आणि नंतर 2012 मध्ये हा कारखाना लिलावात काढला. त्यानंतर याच गबरू जवानाच्या बारामती अॅग्रोने कारखाना फक्त 50 कोटींमध्ये खरेदी केला. साच साखर कारखान्याने नंतर 150 कोटी रुपयांचे कर्ज घेतले. HDIL , PMC Bank, पत्राचाळ घोटाळ्यात या गबरू जवानाने किती साखर खाल्ली आहे, हे लवकरच कळेल,'' अशा आशयाचे ट्विट कंबोज यांनी केले आहे.

"ईडी चौकशीसाठी आमची सहकार्याची भुमिका"- रोहित पवार

ईडी चौकशीच्या पार्श्वभुमीवर आमदार रोहित पवार यांनी सबंधित यंत्रणांना सहकार्य करण्याची भुमिका घेतल्याचे सांगितले.  नेमकं प्रकरण काय, कशाच्या आधारे बातम्या आल्या, हे माहिती नाही. मला हा विषय समजून घ्यावा लागेल, मला याबद्दल निरोप आल्यानंतर सत्यता लोकांसमोर ठेवू. आता जी कारवाई आहे, ती कोणत्या हेतूने किंवा जाणीवपूर्वक झालीय का हे पहावे लागेल. मात्र न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास आहे. मी एक सामान्य कार्यकर्ता म्हणून जी चौकशी असेल, त्याला सामोरे जाईल. त्यात काय प्रकरण आहे. हे पहावे लागेल. यापूवीर्ही वेगवेगळ्या यंत्रणांनी बोलावले आहे. त्यावेळी आम्ही सहकार्यच केले आहे. तसेच आताही सहकार्य करणार असल्याची भुमिका आमदार पवार यांनी मांडली. 

टॅग्स :Rohit Pawarरोहित पवारMohit Kambojमोहित कंबोज भारतीयEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय