हरिजन सेवक संघाच्या प्रदेशाध्यक्षपदी मोहन जोशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2025 09:19 IST2025-05-18T09:18:49+5:302025-05-18T09:19:14+5:30

हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शंकर कुमार संन्याल यांनी मोहन जोशी यांना नियुक्तीचे पत्र नुकतेच दिले. हरिजन सेवक संघाच्या वतीने आदिवासी भागात वसतिगृहे आणि शाळा चालविल्या जातात. तसेच ग्रामीण भागात गरीब विद्यार्थ्यांसाठी शाळा, अभ्यासिका चालविल्या जातात. 

Mohan Joshi appointed as state president of Harijan Sevak Sangh | हरिजन सेवक संघाच्या प्रदेशाध्यक्षपदी मोहन जोशी

हरिजन सेवक संघाच्या प्रदेशाध्यक्षपदी मोहन जोशी

मुंबई  : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी स्थापन केलेल्या हरिजन सेवक संघ,  महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी माजी आमदार, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांची पाच वर्षांकरिता नियुक्ती करण्यात आली आहे. 

 हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शंकर कुमार संन्याल यांनी मोहन जोशी यांना नियुक्तीचे पत्र नुकतेच दिले. हरिजन सेवक संघाच्या वतीने आदिवासी भागात वसतिगृहे आणि शाळा चालविल्या जातात. तसेच ग्रामीण भागात गरीब विद्यार्थ्यांसाठी शाळा, अभ्यासिका चालविल्या जातात. 

राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचार, प्रसाराचे कार्य हरिजन सेवा संघातर्फे करण्यात येते. त्याचा विस्तार आगामी काळात केला जाईल. सेवक संघात सर्व जाती धर्माच्या युवक, युवतींचा सहभाग वाढावा यासाठी प्रयत्न करू आणि युवा वर्गाकडून नवनवीन कल्पना घेऊन कार्याला आधुनिकतेची जोड दिली जाईल, असे मोहन जोशी यांनी निवडीनंतर सांगितले.
 
Web Title: Mohan Joshi appointed as state president of Harijan Sevak Sangh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.