मोदींची हवा विरली - राज ठाकरे

By Admin | Updated: July 11, 2014 16:10 IST2014-07-11T16:09:32+5:302014-07-11T16:10:32+5:30

ज्या नरेंद्र मोदींच्या नावावर स्वार होत भाजपने लोकसभा निवडणुकीत भरघोस यश मिळवले त्या नरेंद्र मोदींची हवा आता विरली आहे अशी टीका राज ठाकरेंनी केली आहे.

Modi's wind blew away - Raj Thackeray | मोदींची हवा विरली - राज ठाकरे

मोदींची हवा विरली - राज ठाकरे

 

ऑनलाइन टीम
मुंबई, दि. ११- लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींना पाठिंबा देणारे मनसेअध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा यु टर्न घेत मोदीविरोधी वक्तव्य केले आहे. ज्या नरेंद्र मोदींच्या नावावर स्वार होत भाजपने लोकसभा निवडणुकीत भरघोस यश मिळवले त्या नरेंद्र मोदींची हवा आता विरली आहे अशी टीका राज ठाकरेंनी केली आहे. 
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे शुक्रवारी माटुंगा येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यात तरुण कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना राज ठाकरेंनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच टीकेचे लक्ष्य केले. लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींना सोशल मिडीयाने उचलून धरले. आता तीच सोशल मिडीया मोदींविरोधात लिहीत आहे. त्यामुळे सोशल मिडीयापासून चार हात लांबच राहा असा सल्लाही राज ठाकरेंनी युवा कार्यकर्त्यांना दिला आहे. 

Web Title: Modi's wind blew away - Raj Thackeray