शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

मोदींचा मुक्काम... अन् वाढलेले ‘हार्ट बिट’ !

By admin | Updated: August 22, 2014 01:33 IST

मुसळधार पावसामुळे मोदींना तासभर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर मुक्काम ठोकण्याची पाळी आली. त्यांच्या तासभर मुक्कामामुळे मात्र विमानतळावरील अधिकारी-कर्मचाऱ्यांचे ‘हार्ट बिट’

अधिकाऱ्यांची धावपळ : कँटीनमधील खाद्यपदार्थही संपलेदयानंद पाईकराव - नागपूर मुसळधार पावसामुळे मोदींना तासभर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर मुक्काम ठोकण्याची पाळी आली. त्यांच्या तासभर मुक्कामामुळे मात्र विमानतळावरील अधिकारी-कर्मचाऱ्यांचे ‘हार्ट बिट’ वाढून त्यांची चांगलीच धावपळ झाली. अखेर दुपारी ४.३५ वाजता पावसाचा जोर ओसरल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हेलिकॉप्टरने मौदाकडे रवाना झाले आणि सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी दुपारी ३.०५ वाजताच्या दरम्यान बोईंग ७३७ क्रमांकाच्या इंडियन एअर फोर्सच्या विशेष विमानाने नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाले. जोरदार पाऊस असल्यामुळे विमानाजवळ जाऊन त्यांचे स्वागत करण्याची संधी विमानतळावर उपस्थित भाजपचे नेते, पदाधिकाऱ्यांना मिळाली नाही. विमानातून खाली उतरल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी सुरक्षा रक्षकांच्या गराड्यात दुपारी ३.२० वाजता कारमध्ये बसून टर्मिनल बिल्डींगच्या व्हीआयपी लाऊंजमध्ये आले. थोडा पाऊस कमी झाल्यानंतर मौदाकडे रवाना होण्याचा त्यांचा बेत होता. दुपारी ३.३२ पर्यंत ते व्हीआयपी लाऊंजमध्ये बसून होते. परंतु खराब वातावरणामुळे एअर फोर्सच्या हेलिकॉप्टरने उड्डाण करण्याचे टाळले. ३.४७ वाजेपर्यंत पाऊस थोडाही कमी न झाल्यामुळे मोदींचा मौदा दौरा रद्द करण्यात आल्याची बातमी आली. ४.१० वाजता पुन्हा मोदी रस्ते मार्गाने मौदाकडे जाण्याचा विचार करीत असल्याचा दुसरा निरोप आला. परंतु पुन्हा २० मिनिटांनी ४.३० वाजता पाऊस पूर्णपणे थांबला आणि मोदींचे हेलिकॉप्टर तयार करण्याची तयारी सुरू झाली. हेलिकॉप्टर उड्डाणासाठी तयार झाल्यानंतर मोदी व्हीआयपी लाऊंजमधून बाहेर पडून कारने हेलिकॉप्टरपर्यंत पोहोचले. दुपारी ४.४१ वाजता त्यांचे हेलिकॉप्टर मौदाच्या दिशेने झेपावले. तेथून सायंकाळी ६.०१ वाजता ते नागपूरला परतले आणि ६.१३ वाजता कस्तूरचंद पार्ककडे रवाना झाले. तेथील कार्यक्रम आटोपून ते सायंकाळी ७.५६ वाजता विशेष विमानाने दिल्लीकडे रवाना झाले.कँटीनचे पदार्थ संपलेपंतप्रधान मोदींना ‘अटेंड’ करण्यासाठी ४० ते ५० पदाधिकारी विमानतळाच्या टर्मिनल बिल्डींगमध्ये उपस्थित होते. त्यामुळे त्यांच्या नाश्त्याची व्यवस्था करताना अधिकाऱ्यांची धावपळ झाली. त्यांनी विमानतळावरील कँटीनमधून सँडविच, कुकीज, नमकीन आणि इतर खाद्यपदार्थ बोलविले. परंतु एवढ्या लोकांना खाद्यपदार्थ पुरविताना कँटीनमधील खाद्यपदार्थच संपून गेले होते.दर दहा मिनिटांनी तपासली ‘व्हिजिबिलीटी’हेलिकॉप्टरला आकाशात उड्डाण भरण्यासाठी किमान १५०० मीटरची ‘व्हिजिबिलीटी’ (दृष्यता) असणे गरजेचे आहे. परंतु मुसळधार पावसामुळे ‘व्हिजिबिलीटी’ ५०० मीटरपर्यंत खालावली होती. अशा परिस्थितीत हेलिकॉप्टर आकाशात झेपावणे शक्य नव्हते. त्यामुळे विमानतळावरील अधिकाऱ्यांना दर दहा मिनिटांनी ‘व्हिजिबिलीटी’ तपासावी लागत होती.अधिकाऱ्यांनी बजावली चोख कामगिरीपंतप्रधान मोदींचा दौरा, त्यातल्या त्यात मुसळधार पाऊस सुरू झालेला असल्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील अधिकाऱ्यांचे ‘टेन्शन’ आणखीनच वाढले. ‘व्हिजिबिलीटी’ तपासणे, पंतप्रधानांची व्हीआयपी लाऊंजमध्ये व्यवस्था करणे आणि यासोबतच नियमित येणाऱ्या प्रवासी विमानांचेही व्यवस्थापन करण्याची जबाबदारी त्यांच्यावर येऊन ठेपली. परंतु कार्यकारी विमानतळ संचालक मनीष कुमार, विशेष कार्य अधिकारी शफिक शहा, संचार प्रमुख प्रशांत निखारे यांनी चोख कामगिरी बजावून सर्व प्रकारच्या जबाबदाऱ्या यशस्वीरीत्या पार पाडल्या.