मोदींनी आता केंद्राचे पहावे!

By Admin | Updated: October 5, 2014 01:54 IST2014-10-05T01:54:33+5:302014-10-05T01:54:33+5:30

निलंगा येथे शनिवारी आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. राज म्हणाले की, राज्यातील चारही पक्षांनी राजकारणांचा खेळ मांडला आहे.

Modi should see the center now! | मोदींनी आता केंद्राचे पहावे!

मोदींनी आता केंद्राचे पहावे!

>निलंगा (जि.लातूर) : नरेंद्र मोदींनी आता केंद्राचे पहावे. आमच्या महाराष्ट्राचे आम्ही बघून घेऊ, असा पंतप्रधानांना खरमरीत सल्ला देत राज ठाकरे यांनी राज्यातील चारही प्रमुख पक्ष एका माळेचे मणी असून, एकदा मनसेच्या हाती सत्ता द्या़ जगाने पाहीला नसेल असा महाराष्ट्र मला घडवायचा आहे, अशा शब्दात मतदारांना आवाहन केले. 
निलंगा येथे शनिवारी आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. राज म्हणाले की, राज्यातील चारही पक्षांनी राजकारणांचा खेळ मांडला आहे. 
हे सर्व पक्ष वेगळे वेगळे असल्याचे सांगत असले तरी आतून सगळे एक आहेत. कारभार करताना यांची मिलिभगत आहे. आमदार सभागृहात प्रश्न विचारतात आणि रात्री मंत्र्यांच्या बंगल्यात साटेलोटे करतात, असा गंभीर आरोपही राज यांनी केला़ (प्रतिनिधी)
 
निवडणूक आयोगावरही टीका
राज ठाकरे यांनी निलंग्याच्या सभेत पुन्हा एकदा निवडणूक आयोगावर टिका केली. ऑक्टोबर हिट आणि सणासुदीचे दिवस पाहता दिवाळीनंतर निवडणुका घेतल्या असत्या तर काय बिघडले असते. नाहीतर एरवी त्यांना काय काम असते ? अशा भाषेत समाचार घेतला. 

Web Title: Modi should see the center now!