मोदींनी माफी मागावी : प्रणिती

By Admin | Updated: December 30, 2016 00:48 IST2016-12-30T00:48:37+5:302016-12-30T00:48:37+5:30

चलनबंदी फसली आहे. काळा पैसा सापडलेला नाही, त्यामुळे देशातील सामान्य नागरिकांना दिलेल्या त्रासाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता देशाची माफी मागावी, अशी

Modi should apologize: Praniti | मोदींनी माफी मागावी : प्रणिती

मोदींनी माफी मागावी : प्रणिती

पुणे : चलनबंदी फसली आहे. काळा पैसा सापडलेला नाही, त्यामुळे देशातील सामान्य नागरिकांना दिलेल्या त्रासाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता देशाची माफी मागावी, अशी मागणी काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी केली.
काँग्रेसभवन येथे पत्रकारांशी संवाद साधताना प्रणिती शिंदे यांनी देशातील एकूणच वातावरण भितीदायक झाले असल्याचे सांगितले. त्या म्हणाल्या, १४ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम बँकेत जमा झाली आहे. मग काळा पैसा केला कुठे?’’ शंभर रुपये डेबिट, क्रेडिट कार्ड, पेटीएमच्या माध्यमातून १ लाख वेळा फिरले तर त्या कंपन्यांना कमिशन मिळते. (प्रतिनिधी)

Web Title: Modi should apologize: Praniti