शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

"INDIA एकत्र आल्याने मोदींना NDA ची आठवण; बाप, काका अन् पार्टी चोरणारे हेच चोर"

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2023 10:55 IST

हा INDIA तुमच्या हुकुमशाहीचा पराभव केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा संजय राऊतांनी दिला आहे.

मुंबई – काल २६ पक्षांची बैठक झाली, हे सर्व पक्ष देशाच्या कानाकोपऱ्यात रुजलेले आहेत. विरोधकांची बैठक पाहून मोदींना NDA ची आठवण झाली. गेल्या ९ वर्षात आठवण झाली नव्हती. मित्रपक्ष, सहकारी आठवले नव्हते. पण आम्ही बंगळुरू, पाटणात एकत्र आल्याने मोदींना NDA आठवली. याबद्दल त्यांच्या सहकारी पक्षाने मोदींचा सत्कार केला पाहिजे. विरोधक एकत्र आलेत ही भीती आहे. मोदी इज इंडिया हा इंडियाचा अपमान नाही का? भाजपा म्हणजे इंडिया नाही. प्रत्येक व्यक्ती देशाचा इंडिया आहे. भ्रष्टाचाराचे संघटन असल्याचा आरोप करतात. पण ७० हजार कोटींचा आरोप असणारे बाजूला घेऊन उभे करताय. या देशातला प्रत्येक नागरिक इंडिया आहे. भारताचा विजय होईल अन् भाजपाचा पराभव अशा शब्दात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपावर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.

संजय राऊत म्हणाले की, NDA ची आठवण तुम्हाला आता झाली, आम्ही एकत्र आलो म्हणून तुम्हाला मित्रपक्ष आठवले. हा INDIA तुमच्या हुकुमशाहीचा पराभव केल्याशिवाय राहणार नाही. इंडिया, भारत, हिंदुस्तान जिंकणार, हुकुमशाहीचा पराभव होईल. हिंमत असेल तर एनडीएने भारताचा पराभव करून दाखवा. अमित शाहदेखील जेलमध्ये गेले होते. अजित पवार, हसन मुश्रीफ जेलमध्ये जायला निघाले होते. सगळे जामिनावर सुटलेले लोक आहेत असा आरोप त्यांनी केला.

तसेच इंडिया आमचा परिवार आहे. देशात ज्यारितीने हुकुमशाही सरकार चालवले जातेय त्याविरोधात इंडिया लढणार आणि जिंकणार. तुम्ही इंडियाविरोधात षडयंत्र करत आहात. तुमच्यासोबत असणाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहे. सिंचन घोटाळा, इक्बाल मिर्चीसोबत असणारे एकत्र आले. इंडिया एकत्र आल्यावर एनडीएची आठवण झाली. विरोधकांची पुढील बैठक मुंबईत होणार आहे असं खासदार संजय राऊत म्हणाले.

सर्वात मोठे चोर हेच...

दरम्यान, अजित पवारांची पार्टी कोणती? सर्वात मोठे चोर हेच, बाप, काका चोरणारे, या चोरांना घेऊन NDA बनली आहे. अजित पवारांकडे कोणती पार्टी आणि खासदार आहेत. मी गांधींचा भक्त, ना मी वाईट करतो, ना वाईट बघतो पण वाईटाचा अंत करतो असा इशारा खासदार संजय राऊतांनी दिला.   

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी