शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

मोदी सरकारचे गर्वाचे घर खाली : यशवंत सिन्हा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2018 18:51 IST

सत्ताधारी सत्तेच्या मदतीने कितीही खेळ करीत असले तरी लोकशाहीत मतदारांचा कौल महत्वाचा ठरतो.

ठळक मुद्देपुणे श्रमिक पत्रकार संघाचे संस्थापक ज. स. करंदीकर यांच्या स्मृती व्याख्यानसमानता राखण्याचे आव्हान सर्वांपुढे असणारलोकशाहीतील चारही स्तंभाची अवस्था केविलवाणीजातीय ध्रुवीकरणाच्या मदतीने निवडणुका जिंकता येत नसल्याचे स्पष्ट

पुणे : सत्ता एकदा डोक्यात गेली की, त्याचे काय परिणाम होतात हे सध्या ज्या पाच राज्यांतील निवडणुकांवरुन स्पष्ट होत आहे. भाजपला सत्तेविषयी जो गर्व होता तो जनतेने खाली उतरवला. सत्तेची गुर्मी आणि हुकुमशाही याच्या जोरावर राज्य करणाऱ्यांना जनतेने आपला कौल नाकारला. ही लोकशाहीचे ताकद असल्याचे मत माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी व्यक्त केले. तसेच लोकशाहीच्या चारही स्तंभावर राजकीय व्यवस्थेचा होत चाललेला घट्ट विळखा आगामी काळात धोकादायक ठरणार असून समानता राखण्याचे आव्हान सर्वांपुढे असणार असल्याचे त्यांनी सांगितले. पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित पुणे श्रमिक पत्रकार संघाचे संस्थापक ज. स. करंदीकर यांच्या स्मृती व्याख्यानात सिन्हा यांनी ‘सध्याची राजकीय समीकरणे आणि माध्यमे’ या विषयावर विचार व्यक्त केले. याप्रसंगी संघाचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेंद्र बडदे, सरचिटणीस पांडुरंग सांडभोर, विठ्ठल जाधव आदी उपस्थित होते.  दोन दिवसांपूर्वी मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, मिझोराम आणि तेलंगणा या राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये सपशेल शरणागती पत्करलेल्या भाजपाच्या पराभवावर टीका करताना सिन्हा म्हणाले, एखाद्या व्यक्तीला देवाचे स्थान देऊन भक्ताप्रमाणे त्याच्या चुकांकडे दुर्लक्ष करणे महागात पडु शकते. आज सगळे वातावरण शांत आहे याचा अर्थ भविष्यात सगळी परिस्थिती अलबेल असे नाही. गृहमंत्री, अर्थमंत्री, संरक्षणमंत्री, परराष्ट्रमंत्र्यांना त्यांच्या खात्यात महत्वाचे बदल होत आहेत याची साधी कल्पना देखील देण्याचे सौजन्य मोदी दाखवत नाहीत. चलन बदलाचा निर्णय प्रत्यक्ष अंमलात आणण्याची वेळ आली तेव्हा तो अर्थमंत्र्यांना सांगण्यात आला. कुणालाही विश्वासात न घेता केवळ ‘दोघे’जण जर सगळ्या देशाची सुत्रे आपल्या हातात ठेवणार असतील तर यापुढची परिस्थिती कशी असेल? अशा शब्दांत सिन्हा यांनी मोदी आणि शहांचे नाव न घेता टीका केली. सत्ताधारी सत्तेच्या मदतीने कितीही खेळ करीत असले तरी लोकशाहीत मतदारांचा कौल महत्वाचा ठरतो. मतदार सर्वाधिक हुशार असतात. भाजपातील सर्व नेत्यांचे मुखवटे आता गळून पडू लागले आहेत. यावेळी त्यांनी योगी आदित्यनाथ यांच्या नावाचा दाखला देऊन केवळ जातीय ध्रुवीकरणाच्या मदतीने निवडणुका जिंकता येत नसल्याचे स्पष्ट केले. .....................लोकशाही टिकविण्याची जबाबदारी माध्यमांवर संसदेत संसदशाही चालु द्यायची नाही असा प्रयत्न जाणीवपूर्वक केला जात आहे. जिथे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश मुख्य न्यायाधीशांच्या कारभाराविरोधात जाहीरपणे बोलतात, तसेच माध्यमांना आपल्या सोयीनुसार उपयोगात आणण्याचे कारस्थान सुरु असते. हे सगळे एका विशिष्ट राजकीय विचारशक्तींच्या पाठिंब्यामुळे शक्य होत नाही. दुसºया बाजुला संसदेची परिस्थिती शोचनीय आहे. संसदेची भूमिका आता कमी होत आहे. अधिवेशनाचे कामकाज फार काळ चालु दिले जात नाही. विशेष म्हणजे हे सगळे एका पूर्व नियोजित पध्दतीप्रमाणे सुरु आहे. लोकशाहीतील चारही स्तंभाची अवस्था केविलवाणी असून हे सगळी परिस्थिती बदलण्याची जबाबदारी आता माध्यमांनी घेणे गरजेचे असल्याचे सिन्हा यांनी यावेळी सांगितले. 

टॅग्स :PuneपुणेYashwant Sinhaयशवंत सिन्हाBJPभाजपाElectionनिवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदी