आधुनिक ‘आनंदीबाई’नं म्हणो समेट ‘बि’घडविला !
By Admin | Updated: October 4, 2014 02:03 IST2014-10-04T02:03:08+5:302014-10-04T02:03:08+5:30
पुण्याचा शनिवारवाडा परिसर. वेगवेगळ्या पक्षाचे कार्यकर्ते ‘दुर्बीण’ अन् ‘भिंग’ घेऊन काहीतरी हुडकत निघालेले. त्यामुळं रस्त्यावर ‘ट्रॅफिक जाम’ झालेलं. तसं तर.. रोजचंच असतं, हा भाग वेगळा.)

आधुनिक ‘आनंदीबाई’नं म्हणो समेट ‘बि’घडविला !
>(स्थळ : पुण्याचा शनिवारवाडा परिसर. वेगवेगळ्या पक्षाचे कार्यकर्ते ‘दुर्बीण’ अन् ‘भिंग’ घेऊन काहीतरी हुडकत निघालेले. त्यामुळं रस्त्यावर ‘ट्रॅफिक जाम’ झालेलं. तसं तर.. रोजचंच असतं, हा भाग वेगळा.)
पुणोरी दुचाकीस्वार : (हेल्मेटमधूनच जोरात बडबडत) शीùù ट. काय कटकट आहे बुवा या कार्यकत्र्याची. मंडपात पत्ते कुटायचं सोडून रस्त्यावर का कडमडलेत, कुणास ठाऊक?
दुचाकीस्वाराची पत्नी : (तोंडाला बांधलेल्या स्कार्फमधूनच पुटपुटत) या आऊटडोअर लोकांनी आपल्या पुण्याची सिस्टिम पाùùर बिघडवलीय हो. टोटली फुलीùùशनेस बघा.
पहिला कार्यकर्ता : (दुर्बिणीतून नजर न हटवता) प्युअर इंग्लिशमधून पुणोरी संस्कृती जपणारी ही मंडळी लईùù भारी राव.
दुसरा कार्यकर्ता : (शनिवार वाडय़ालगतच्या पुस्तक दुकानातील एका जुनाट ग्रंथावर भिंग फिरवत) हा बघा दुर्मीळ दस्तऐवज. ‘शिवशाही’ नष्ट का झाली, याचा शोध लागेल, या जुन्या पुस्तकातून.
तिसरा कार्यकर्ता : (कपाळावर बडवून घेत) अरे लेकाùù. त्याला ‘पिवळं पुस्तक’ म्हणतात पुण्याच्या भाषेत. कशाला हात लावतोयस त्याला? आधीच मोबाइलमधल्या इंटरनेटमुळं कमी बिघडलात की काय तुम्ही?
पहिला कार्यकर्ता : .पण आपल्याला तर ‘आनंदीबाई’ची माहिती हवीय नां. तिचा ‘शिवशाही’शी काय संबंध? तिनं तर म्हणो ‘पेशवाई’ची वाट लावलेली.
दुसरा कार्यकर्ता : (खोचकपणो) आपल्याला सध्याची महायुतीची ‘शिवशाही’ मोडीत काढणारी ‘आधुनिक आनंदीबाई’ हुडकायचीय रे.
तिसरा कार्यकर्ता : (कागदांच्या बंडलातून कोणत्यातरी ज्योतिषाचं पुस्तक हुडकून काढत) अरे हे बघùù. ‘नॉस्ट्रा का फेमस’ पुस्तकात तर लिहिलंय की, एकविसाव्या शतकातली ‘नियोजित शिवशाही’ संपवायला ‘नागपुरी पेशवाई’च कारणीभूत ठरणारेय. फक्त फरक इतकाच की, तीनशे वर्षापूर्वीची पेशवाई पुण्याच्या शनिवारवाडय़ात नांदलेली. या ‘नव्या पेशवाई’ची सूत्रं मात्र, थेट ‘सुरत’मधून हलणारी.
पहिला कार्यकर्ता : (हळहळत) खरंतर, ‘पेशवाई’नं डाव साधल्यानंतरही दोन भावांना नवी ‘शिवशाही’ स्थापण्याची संधी पुन्हा आली होती रे; पण या दोघांमध्ये नेहमी ‘ध’चा ‘मा’ करणारी ‘आनंदीबाई’ म्हणो पुन्हा जिंकली. ‘कृष्णकुंज’चा तडफडाट पाहून ‘मिनी मातोश्री’ हळूच हसली.
दुसरा कार्यकर्ता : समेट ‘घ’डवावा, हा पाठविलेला निरोप म्हणो समेट ‘बि’घडवावा, असाच पोहोचला.
तिसरा कार्यकर्ता : (गंभीरपणो) अशा ‘आनंदीबाई’ तर अनेक पक्षांत ठाण मांडून बसल्यात. आपला ‘रिमोट’ तोकडा पडू नये म्हणून, त्या ‘राजा’ला कधीच मोठं होऊ देत नाहीत.
पहिला कार्यकर्ता : (गालातल्या गालात हसत) म्हणूनच आपल्या महाराष्ट्राला ‘तोड मोड के जोड’वाल्या कुबडय़ांच्या सरकारची परंपरा लाभलीय वाटतं.
- सचिन जवळकोटे