शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

प्रसारमाध्यमांचा संयम; मोबाइलधारक मात्र बेभान, सोशल मीडियावरील अततायीपणा जीवावर बेतणारा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2017 16:20 IST

साठ लाखाच्या खंडणीसाठी पूर्णानगर येथून अपहरण करून नेलेल्या सात वर्षाच्या ओम संदीप खरात या मुलाची पोलिसांनी सुखरूप सुटका केली, पण...

संजय मानेपिंपरी : साठ लाखाच्या खंडणीसाठी पूर्णानगर येथून अपहरण करून नेलेल्या सात वर्षाच्या ओम संदीप खरात या मुलाची पोलिसांनी सुखरूप सुटका केली. त्याच्या सुटकेसाठी पोलिसांनी प्रत्येक पाऊल सावधगिरीने टाकले. अपहरणाचे वृत्त देऊ नका, ओमच्या जीवाला धोका पोहोचू शकेल,अशी विनंती पोलिसांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना केली. ब्रेकिंग न्यूजची स्पर्धा असतानाही पोलिसांना तपासात अडचणी येऊ नयेत,यासाठी प्रसारमाध्यमाचे प्रतिनिधींनी यांनी वृत्त प्रसारित न करता पोलिसांना सहकार्य केले. मोबाईलधारकांनी मात्र आततायीपणा दाखविला. अशा वेळी सोशलमिडियावर माहिती टाकणाºयांनी भान जपावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

जातीय दंगल, प्रक्षोभक वक्तव्य, जातीय तेढ निर्माण होईल, सामाजिक सलोख्याला बाधा पाहोचेल अशा घटना घडल्या तरी पत्रकार सामाजिक भान जपतात. परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांना अपेक्षित सहकार्य करण्याची भूमिका प्रसारमाध्यमांकडून घेतली जाते. भडक वृत्त देण्याचे टाळले जाते. याचा वेळोवेळी प्रत्यय येतोच,परंतू अलिकडच्या काळात सोशल मिडियाचा वापर प्रचंड वाढला आहे. एखादी घटना काही क्षणात अत्यंत वेगाने व्हॉटसअ‍ॅप, फेसबुक,व्टिटरवर व्हायरल होते. कोणताही विचार न करता, एका ग्रुपवरून सहज दुसºया ग्रुपवर माहिती प्रसारित केली जाते. असाच प्रकार ओम खरात या अपहरण झालेल्या मुलाच्या बाबतीत घडला. रोज पोलिसांच्या संपर्कात असलेल्या प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिंधीना सात वर्षाच्या मुलाचे अपहरण झाल्याची माहिती मिळाली होती. त्याच्या सुटकेसाठी पोलीस पथके कार्यरत असल्याने पोलिसांच्या पुढील सूचना येईपर्यंत वृत्त न देण्याचा संयम त्यांनी बाळगला. त्यातूनही व्हॉटसअ‍ॅपच्या काही ग्रुपवर ओमचे अपहरण झाल्याची माहिती टाकली जात होती. ही माहिती कोणीही व्हॉटसअ‍ॅपवर प्रसारित करू नये, असे विविध ग्रुपवर आवाहन केले जात होते. तरिही बेभान मोबाईलधारक ही माहिती बेपर्वाईने सोशल मिडियावर टाकत होते. सुदैवाने ओमची अपहरकर्त्यांच्या तावडीतून सुटका करण्यात पोलिसांना यश आले. ही त्याच्या कुटंूबियांसह सर्वांसाठी आनंदाची बाब आहे. मात्र यापुढे तरी सोशल मिडियावर भान जपले जावे. अशी अपेक्षा व्यकत होत आहे. 

सोशल मिडियामुळे अंध दांपत्य त्रस्त-

लालटोपीनगर, पिंपरी येथे राहणाºया लोखंडे या अंध दांपत्याचे मुलीसह कोणीतरी मोबाईलवर छायाचित्र काढले. छायाचित्रातील मुलगी त्यांची नसून भिक मागण्यासाठी त्या मुलीचा आधार घेतला जात आहे. असा मजकूर व्हॉटसअ‍ॅपवर महिन्यापुर्वी प्रसारित झाला. तेव्हापासून अद्यापपर्यंत लोखंडे दांपत्य त्रस्त आहे. 

टॅग्स :KidnappingअपहरणCrimeगुन्हाPoliceपोलिस