लग्नाच्या आमिषाने मॉडेलवर बलात्कार

By Admin | Updated: June 13, 2016 07:13 IST2016-06-13T05:35:13+5:302016-06-13T07:13:27+5:30

लग्नाचे आमिष दाखवून २१ वर्षीय मॉडेलवर बलात्कार केल्याप्रकरणी वर्सोवा पोलीस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला

Model rape rape model | लग्नाच्या आमिषाने मॉडेलवर बलात्कार

लग्नाच्या आमिषाने मॉडेलवर बलात्कार


मुंबई : लग्नाचे आमिष दाखवून २१ वर्षीय मॉडेलवर बलात्कार केल्याप्रकरणी वर्सोवा पोलीस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मालिकांमध्ये काम करणाऱ्या अरमान ताहीर विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
तक्रारदार मॉडेलचे ताहीरशी प्रेमसंबंध होते. ताहीरने लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. मात्र गेल्या काही दिवसांपासून ताहीर लग्नाचा विषय टाळत असल्याचे तिच्या लक्षात आले. तिने याबाबत वेळोवेळी त्याच्याकडे जाब विचारला, तरी देखील प्रतिसाद येत नसल्याने तिने गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Model rape rape model