मोबाइल चोरल्याच्या संशयातून ठार मारले

By Admin | Updated: October 29, 2014 02:17 IST2014-10-29T02:17:56+5:302014-10-29T02:17:56+5:30

मोबाईल चोरल्याच्या संशयावरून झालेल्या मारहाणीत एकाचा मृत्यु झाला. चौकशीअंती शिरपूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.

The mobile was stolen by the thieves | मोबाइल चोरल्याच्या संशयातून ठार मारले

मोबाइल चोरल्याच्या संशयातून ठार मारले

शिरपूर  (जि. धुळे) : मोबाईल चोरल्याच्या संशयावरून झालेल्या मारहाणीत एकाचा मृत्यु झाला. चौकशीअंती शिरपूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. दोन मारेकरी फरार झाले आहेत़
शुक्रवारी रात्री हाणामारीची ही घटना घडली. अंकुश उर्फ लाल्या पोपट माळी (रा़ वरवाडे) यांचा दहा दिवसांपूर्वी मोबाईल चोरीस गेला. भटू दौलत माळी (4क्, रा़ वरवाडे) यांनी मोबाईल चोरल्याच्या संशयावरुन अंकुश व सागर बापू बुवा यांनी त्यांना हॉकी स्टीक, क्रिकेट स्टॅम्पने वरवाडे गावात बेदम मारहाण केली होती़ त्यात माळी यांची मृत्यु झाला. दिलीप दौलत माळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदविला. आरोपींनी माळी यांना ठार मारून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हाही पोलिसांनी नोंदविला आहे. (प्रतिनिधी)

 

Web Title: The mobile was stolen by the thieves