शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: मुंबई लोकल सेवा बंद, मोटरमनसह रेल्वे कर्मचाऱ्यांचे सीएसएमटी स्थानकात आंदोलन
2
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
3
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
4
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
5
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
6
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
7
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
8
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
9
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
10
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
11
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
12
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
13
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
14
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
15
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
16
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
17
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
18
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
19
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
20
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण

Shalini Thackeray : "सत्य पाहायला जमले नसते म्हणूनच काढता पाय घेतला"; मनसेचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2022 20:05 IST

MNS Shalini Thackeray And Uddhav Thackeray : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील हा चित्रपट पाहिला आहे. पण चित्रपटाचा शेवट न पाहताच मुख्यमंत्री बाहेर पडले. यावरून मनसेने मुख्यमंत्र्यांना खोचक टोला लगावला आहे.

मुंबई - शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे (Anand Dighe)  यांच्या आयुष्यावर बेतलेला ‘धर्मवीर-मुक्काम पोस्ट ठाणे’ (Dharmaveer Mukkam Post Thane) या  सिनेमाची सध्या जोरदार चर्चा आहे. गेल्या 13 मे रोजी हा चित्रपट महाराष्ट्रभर प्रदर्शित झाला. चित्रपटाला उदंड प्रतिसाद मिळतोय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी देखील हा चित्रपट पाहिला आहे. पण चित्रपटाचा शेवट न पाहताच मुख्यमंत्री बाहेर पडले. यावरून मनसेने मुख्यमंत्र्यांना खोचक टोला लगावला आहे.

"सत्य पाहायला जमले नसते म्हणूनच पाय काढता घेतला" असं म्हणत मनसेने निशाणा साधला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे (MNS Shalini Thackeray) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "कारण दादूला पण माहिती आहे की, हिंदुत्वाची खरी जबाबदारी त्यांच्यावर नाही तर माननीय राजसाहेब यांच्यावर धर्मवीर आनंद दिघे साहेब यांनी सोपविली होती. सत्य पाहायला जमले नसते म्हणूनच पाय काढता घेतला.....!!! सच हमेशा कडवा होता है.......!!!! मानो या न मानो....!!!!" असं शालिनी ठाकरे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

आयनॉक्समध्ये ‘धर्मवीर’चा खास शो ठेवण्यात आला होता. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे यांच्यासह उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे हा चित्रपट पाहण्यासाठी आले. चित्रपट पाहिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी चित्रपटाचं भरभरून कौतुक केलं. विशेषत: अभिनेता प्रसाद ओक  (Prasad Oak) याने साकारलेल्या आनंद दिघेंच्या भूमिकेचं त्यांनी तोंडभरून कौतुक केलं. ‘मी चित्रपट पाहतोय, असं एक क्षणही वाटलं नाही. प्रसाद ओक यांनी इतकी जिवंत व्यक्तिरेखा साकारली आहे. त्यांचा अभिनय फारच जबरदस्त आहे. प्रसाद ओक यांनी आनंद दिघे यांच्या लकबी हुबेहुब साकारल्या आहेत. त्यांनी हे सर्व कसं केलं माहित नाही. हा चित्रपट सर्वांनी पाहावा असा आहे. पण मी जाणीव पूर्वक चित्रपटाचा शेवट पाहिला नाही. कारण तो फारच त्रासदायक आहे. जेव्हा ही घटना घडली होती तेव्हा स्वत: बाळासाहेब देखील फार भावूक झाले होते. आनंद दिघे गेल्यानंतर व्यथित झालेले बाळासाहेब मी पाहिले आहेत, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

शेवटच्या सीनमध्ये काय आहे?

‘धर्मवीर’ चित्रपटाच्या शेवटच्या 10 मिनिटात आनंद दिघे यांच्या जीपला झालेल्या अपघाताचा प्रसंग दाखवण्यात आला आहे. हा प्रसंग कोणत्याही शिवसैनिकाला भावूक करणारा आहे. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी हा प्रसंग पाहण्याचं टाळलं. ‘धर्मवीर’ या चित्रपटाला सध्या उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. चित्रपटाचे अनेक शो हाऊसफुल आहेत. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने 1.90 कोटी  रूपयांचा बिझनेस केला. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेMNSमनसेPoliticsराजकारण