शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीसाठी मनसे आमदाराकडून अडीच लाखांची मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2021 16:39 IST

MNS MLA Raju Patil donation for Ayodhya Ram temple : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राजू पाटील यांनीही अयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामासाठी देणगी दिली आहे. 

ठळक मुद्देराजू पाटील यांनी राम मंदिरासाठी 2 लाख 51 हजार रुपयांचा धनादेश मदत म्हणून दिला आहे.

मुंबई : अयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामासाठी देणगी गोळा करण्याच्या मोहिमेला सुरुवात झाली आहे. विश्व हिंदू परिषदेकडून देशात सध्या वर्गणी गोळा केली जात आहे. देशाच्या विविध भागातून राम मंदिर बांधण्यासाठी लोक देणगी देत ​​आहेत. दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राजू पाटील यांनीही अयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामासाठी देणगी दिली आहे. 

राजू पाटील यांनी राम मंदिरासाठी 2 लाख 51 हजार रुपयांचा धनादेश मदत म्हणून दिला आहे. राम मंदिर उभारण्याच्या या पवित्र कार्यात खारीचा वाटा उचलण्याचे भाग्य प्राप्त झाले, असे म्हणात राजू पाटील यांनी स्वत: आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर याबाबतची माहिती दिली आहे. 

"आज जगभरातील सकल हिंदू समाज एकवटून अयोध्येतील ‘श्रीराम मंदिर निर्माण निधी’ संकलन करून यथाशक्ती योगदान देत आहे. काल मला पण या पवित्र कार्यात खारीचा वाटा उचलण्याचे भाग्य प्राप्त झाले," असे राजू पाटील ट्विटरवर म्हणाले. याचबरोबर, "गणेश मंदिर ट्रस्टी अच्युत कराडकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कल्याण जिल्हाप्रमुख अण्णा गाणार, संघ कार्यकर्ते उदय कुलकर्णी, सुरेश फाटक यांची भेट घेऊन त्यांच्याकडे धनादेश सुपूर्द केला आणि प्रभू श्रीराम मंदिराची छोटी प्रतिकृती भेट दिली", असेही ट्विट राजू पाटील यांनी केले आहे.

दरम्यान, अयोध्येतील राम मंदिर उभारणीसाठी अनेक दिग्गजांनी देणग्या दिल्या आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पाच लाखांचा धनादेश दिला आहे. तर काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी 1 लाख 11 हजार 111  रुपयांचा धनादेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामार्फत रामजन्मभूमी तीर्थ ट्रस्टला पाठविला आहे. याचबरोबर, भाजपा खासदार आणि माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर यांच्याकडून राम मंदिरासाठी 1 कोटी रुपयांचा निधी देण्यात आलेला आहे.

अयोध्येतील राम मंदिरासाठी मुस्लिमांचाही पुढाकारअयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीसाठी विश्व हिंदू परिषदेकडून देशात सध्या वर्गणी गोळा केली जात आहे. या मोहिमेमध्ये मुस्लीम देखील मागे राहीलेले नाहीत. अयोध्येच्या पवित्र नगरीला धर्मनिरपेक्षता आणि सर्वधर्मसमभावाचे प्रतिक बनविण्यासाठी वासी हैदर यांच्याकडून 12 हजार, तर शाह बानो यांच्याकडून 11 हजार रुपयांची वर्गणी देण्यात आली आहे. बाबरी मशिदीच्या ऐतिहासिक निकालानंतर या बाबरीची बाजू लढवणारे वकील इक्बाल अन्सारी यांनीही राम मंदिराच्या उभारणीसाठीच्या महाअभियानाचे स्वागत केले होते. "राम मंदिराच्या उभारणीसाठी मुस्लिमांनी पुढाकार घेऊन दान केले तर नक्कीच हे दोन्ही धर्मातील एकोपा वाढविण्याचे संपूर्ण देशात प्रतिक ठरेल", असे अन्सारी म्हणाले होते. 

टॅग्स :Raju Patilराजू पाटीलRam Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याMNSमनसेdombivaliडोंबिवली