शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कॅन्सर रुग्णाचे पैसे परत न करणाऱ्या हॉटेल व्यावसायिकाला मनसेकडून चोप; मारहाणीचं फेसबुक लाईव्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2019 13:07 IST

ठाण्याचे मनसेचे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांची व्यावसायिकाला मारहाण

विरार: कर्करोग पीडित व्यक्तीची आर्थिक फसवणूक करणाऱ्या हॉटेल मालकाला मनसेनं चोप दिला आहे. राजू शेट्टी असं फसवणूक करणाऱ्या व्यक्तीचं नाव असून तो हॉटेल मालक आहे. विशेष म्हणजे मनसेनं या मारहाणीचं फेसबुक लाईव्ह केलं. यामध्ये ठाण्यातील मनसेचे नेते अविनाश जाधव हे शेट्टी यांना मारहाण करताना दिसत आहेत. विरारमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीनं राजू शेट्टी यांची तक्रार मनसेकडे केली होती. शेट्टींनी आपल्याकडून 16 लाख रुपये घेतले. मात्र आता ते रक्कम देण्यास टाळाटाळ करत असल्याचं पीडित व्यक्तीनं मनसेच्या पदाधिकाऱ्यांना सांगितलं. यानंतर काल मनसेचे ठाणे जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांनी शेट्टी यांना गाठलं आणि त्यांनी झाल्या प्रकाराबद्दल शेट्टी यांना जाब विचारला. यानंतर जाधव यांनी शेट्टी यांना बेदम मारहाण केली. मनसेनं या घटनेचं फेसबुक लाईव्हदेखील केलं.संबंधित पीडित व्यक्तीला कर्करोग आहे. तिला उपचारांसाठी उपचारांसाठी दररोज 5 हजार रुपये लागतात. आसपासची माणसं त्या व्यक्तीला मदत करतात. राजू शेट्टी यांच्याकडे पीडित व्यक्तीचे 16 लाख रुपये असूनही ते त्यांना परत करायला तयार नाहीत. त्यामुळेच शेट्टी यांना मनसे स्टाईलनं धडा शिकवण्यात आला, असं अविनाश जाधव यांनी सांगितलं. समोरचा माणूस मेल्यावर तुम्ही पैसे परत करणार का, असा प्रश्न शेट्टी यांना आम्हाला विचारला, असंदेखील जाधव म्हणाले. याआधी 31 जानेवारीला मनसेच्या नितीन नांदगावकरांनी मुंबईतील बांद्रा कुर्ला संकुलात एका रिक्षा चालकाला चोप दिला होता. त्या रिक्षा चालकानं एका मराठी तरुणाशी किरकोळ कारणावरून वाद घालून त्याला धक्काबुक्की करत शिवीगाळ केली होती. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मनसे कार्यकर्ते नितीन नांदगावकर यांनी त्या रिक्षा चालकाला शोधून काढण्यासाठी मोहीम हाती घेतली. हा रिक्षा चालक मनसेच्या कार्यकर्त्यांना बीकेसीमध्ये सापडला. त्यानंतर नांदगावकर यांनी त्याला समज देत चोप दिला. 

टॅग्स :MNSमनसेFacebookफेसबुकcancerकर्करोग