भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटमध्ये लागलेल्या आगीत १० चिमुकल्या बाळांचा मृत्यू झाला. मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास ही आग लागली असून १७ बालकांपैकी ७ बालकांना वाचविण्यात यश मिळालं आहे. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हळहळला आहे. या घटनेनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी भावूक पोस्ट शेअर या घटनेवर दु:ख व्यक्त केलं आहे. "नुकतेच जगात आलेल्या १० नवजात बालकांचा गुदमरुन मृत्यू झाल्याची ह्रदयद्रावक घटना भंडारा जिल्ह्यातील सामान्य रुग्णालयामध्ये (Bhandara District General Hospital) घडली आहे. आपल्या पिल्लाला नऊ महिने पोटात वाढविलेल्या आईची या घटनेनंतर काय अवस्था झाली असेल हे फक्त एक आईच समजू शकते. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या बालकांच्या कुटुंबीयांच्या दुःखात महाराष्ट्र नवनिर्माण सेना सहभागी आहे," अशी भावूक पोस्ट शालिनी ठाकरे यांनी शेअर केली आहे.
"नऊ महिने आपल्या पिल्लाला पोटात वाढवलेल्या आईची या घटनेनंतरची अवस्था आईच समजू शकते"
By जयदीप दाभोळकर | Updated: January 9, 2021 18:13 IST
मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांची भावूक पोस्ट
नऊ महिने आपल्या पिल्लाला पोटात वाढवलेल्या आईची या घटनेनंतरची अवस्था आईच समजू शकते
ठळक मुद्देभंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात लागलेल्या आगीमुळे १० बाळांचा झाला होता मृत्यूसरकारनं दिले चौकशीचे आदेश