शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
2
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
3
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
4
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
5
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
6
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
7
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
8
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
9
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
10
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
11
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
12
निधीटंचाई; शेततळ्यांना सरकारनेच दिली कबुली; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती : रक्कम देताना हात आखडता
13
साताऱ्यात मेफेड्रॉन कारखाना उद्ध्वस्त; कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त, सात अटकेत
14
५० एकरहून जास्त भूखंडांवर क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
15
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
16
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
17
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
18
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
19
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
20
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
Daily Top 2Weekly Top 5

Video - "धनुष्याला बाण नाही, बाणाला धार नाही..."; मनसेचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2022 16:35 IST

MNS Gajanan Kale and Shivsena Uddhav Thackeray : मनसे प्रवक्ते गजानन काळे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक गाणं ट्वीट करत टीका केली आहे.

मुंबई - शिवसेनेच्या आमदारांसोबत आता खासदारही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाले आहेत. आमदारांपाठोपाठ आता शिवसेनेला खासदारांनीही धक्का दिला आहे. एकीकडे पक्षातील खासदार, आमदार, नगरसेवक शिंदे गटात सहभागी होत असताना दूसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेशिवसेना भवनात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतात. यावेळी त्यांनी भाजपावर निशाणा साधला होता. माझ्या भात्यातील कितीही बाण घेऊन पळा, पण धनुष्य हे माझ्याकडे आहे, लक्षात ठेवा असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं. यावरून आता मनसेने निशाणा साधला आहे.

"यांचं काही खरं नाही" म्हणत मनसेने उद्धव ठाकरे (Shivsena Uddhav Thackeray) आणि शिवसेनेला खोचक टोला लगावला आहे. मनसे प्रवक्ते गजानन काळे (MNS Gajanan Kale) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक गाणं ट्वीट करत टीका केली आहे. आठ सेकंदचा एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. "धनुष्याला बाण नाही, बाणाला धार नाही, तलवारी चार नाही, यांचं काही खरं नाही" असे या गाण्याचे बोल आहे. यासोबतच त्यांनी बिन_बाणाचे_धनुष्य असा हॅशटॅग देखील वापरला आहे. याआधी देखील गजानन काळे यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. 

काही दिवसांपूर्वी "पक्षातील गळती थांबावी म्हणून छोटे नवाब आता निष्ठा यात्रा काढणार आहेत म्हणे...! खरं तर 'चमत्कार बाबा' संजय राऊत यांना कायमचं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पाठवलं तरी यांच्या नवाब सेनेवरील विघ्न टळेल ... मात्र यांचं आपलं झालंय असं की जखम एकीकडे, मलम भलतीकडे..." असं गजानन काळे यांनी म्हटलं होतं. शिवसेनेत बंडखोरांनी फूट पाडली नाही तर ती भाजपाने पाडली आहे. भाजपाच शिवसेनेला संपवत आहे, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. सध्या शिवसेनाचा कठीण काळ सुरू आहे. मात्र संघर्षाला ठाकरे घाबरत नाही. हे दिवसही जातील, असा विश्वास उद्धव ठाकरेंनी उपस्थितांना दिला. मैदानात उतरु पुन्हा पक्ष नव्याने बांधू, शिवसेना पुन्हा उभी करु, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

दरम्यान, माजी मंत्री आणि शिवसेना नेते रामदास कदम यांनी नेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आत्मपरीक्षण करायला हवं. माझी हकालपट्टी करण्यात आलेली नाही. त्याआधीच मी राजीनामा दिला आहे आणि उद्धव ठाकरे अशी किती जणांची हकालपट्टी करणार आहेत?, असा सवाल रामदास कदम यांनी उपस्थित केला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनीच शिवसेना संपवल्याचा आरोपही रामदास कदम यांनी केला. 

टॅग्स :MNSमनसेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना