शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

Gajanan Kale : "...नाहीतर हा महाराष्ट्र एका मोठ्या अभिनेत्याच्या अभिनयाला मुकेल"; मनसेचा राऊतांना खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2022 12:43 IST

MNS Gajanan Kale Slams Shivsena Sanjay Raut : मनसेचे  प्रवक्ते गजानन काळे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे.

मुंबई - शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या भांडूप येथील निवासस्थानी आज सकाळीच ईडीचे अधिकारी पोहोचले आहेत. राऊत यांच्या घराबाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा असून शिवसेनेचे कार्यकर्तेदेखील मोठ्यासंख्येने जमू लागले आहेत. पत्रा चाळ प्रकरणी राऊत यांना गेल्या काही काळापासून ईडी समन्स बजावत होती. यानंतर आता राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. मनसेने देखील संजय राऊतांना यावरून खोचक टोला लगावला आहे. 

"महाराष्ट्र एका मोठ्या अभिनेत्याच्या अभिनयाला मुकेल" असं म्हणत मनसेने राऊतांवर जोरदार निशाणा साधला आहे. मनसेचे  प्रवक्ते गजानन काळे (MNS Gajanan Kale) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "काहीही करा पण विश्वप्रवक्ते यांना रोज पत्रकार परिषद घेण्यापासून वंचित ठेवू नये ही "ED"ला नम्र विनंती... (आत ठेवा नाहीतर बाहेर पण त्यांना त्यासाठी विशेष परवानगी द्या) नाहीतर हा महाराष्ट्र एका मोठ्या अभिनेत्याच्या अभिनयाला मुकेल" असं गजानन काळे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

"कोणत्याही घोटाळ्याशी माझा काडीमात्र संबंध नाही. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेऊन मी हे सांगत आहे. बाळासाहेबांनी आम्हाला लढायला शिकवलंय. मी शिवसेनेसाठी लढत राहीन" असं संजय राऊत यांनी आणखी एका ट्वीटमध्ये म्हटलं आहे. यावरून आता रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी राऊतांना खोचक टोला लगावला. "संजय राऊत हे स्पष्टोक्ते आहेत, माझे चांगले मित्र आहेत पण त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांची शपथ न घेता शरद पवारांची शपथ घ्यायला पाहिजे होती" असं रामदास कदम यांनी म्हटलं आहे. तसेच "गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर शरद पवार यांचाच अधिक प्रभाव आहे. त्यामुळे त्यांनी जर पवारांची शपथ घेतली असती तर अनेकांना त्यांचे म्हणणे खरे वाटले असते" अशा शब्दांत जोरदार निशाणा साधला आहे. 

"बाळासाहेबांची शपथ घेणं हे चुकीचं, राऊतांनी पवारांची शपथ घ्यायला हवी होती"

"शरद पवारांच्या नादी लागून संजय राऊतांनी शिवसेना संपवली" अशी बोचरी टीकाही रामदास कदमांनी केली आहे. "राज्यात महाविकास आघाडीचा उदय होण्यास सर्वाधिक जाबाबदार हे संजय राऊत राहिले आहेत. त्यांनी राष्ट्रवादी आणि विशेषत: शरद पवार यांच्याबरोबर युती करण्यात जास्त रुची होती. मी मात्र, याला कायम विरोध केला होता, कायम भाजपासोबत युती करावी अशी भूमिका घेतल्याचं रामदास कदमांनी सांगितलं आहे. TV9 मराठीला प्रतिक्रिया देताना त्यांनी असं म्हटलं आहे.  

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतMNSमनसेShiv SenaशिवसेनाEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय