मनसेच्या झेंडयात हिरवा रंग राष्ट्रभक्त मुस्लिमांसाठी - राज

By Admin | Updated: January 7, 2016 18:09 IST2016-01-07T17:45:50+5:302016-01-07T18:09:02+5:30

मनसेच्या झेंडयातील हिरवा रंग भारताला मानणा-या मुस्लिमांसाठी आहे. देश हिताचा विचार करणा-या मुस्लिमांसाठी तो हिरवा रंग आहे.

MNS flame green color for Rampant Muslims - Raj | मनसेच्या झेंडयात हिरवा रंग राष्ट्रभक्त मुस्लिमांसाठी - राज

मनसेच्या झेंडयात हिरवा रंग राष्ट्रभक्त मुस्लिमांसाठी - राज

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. ७ - मनसेच्या झेंडयातील हिरवा रंग भारताला मानणा-या मुस्लिमांसाठी आहे. देश हिताचा विचार करणा-या मुस्लिमांसाठी तो हिरवा रंग आहे अस उत्तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रुईया महाविद्यालयात एका विद्यार्थ्याने विचारलेल्या प्रश्नाला दिले. 
माटुंग्याच्या रुईया महाविद्यालयात मास मिडियाच्या अभ्यासक्रमाला शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी कलाकारण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमामध्ये राज यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. 
आज पत्रकारितेच्या क्षेत्रात जी आव्हान आहेत त्याबद्दल त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी वृत्तवाहिन्या, वर्तमानपत्र आणि सोशल मीडियाचा आढावा घेतला. 
इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडीयामध्ये पत्रकारांची संख्या कमी केली जात आहे. विद्यार्थ्यांनी तंत्रकुशलता आत्मसात करुन बदलत्या माध्यमांचा अभ्यास करायला हवा असा सल्ला राज यांनी दिला. 
माध्यम क्षेत्रात उतरणार असल्याचे राज यांनी संकेत दिले असले तरी, ते माध्यम कोणते याबद्दल त्यांनी सविस्तरपणे बोलणे टाळले. पण माझी व्यंगचित्र तुम्ही त्यातून पाहू शकता असे त्यांनी सांगितले. 

Web Title: MNS flame green color for Rampant Muslims - Raj