शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

"गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्यांपुढे अडचणी अन् बकरी ईदसाठी सुविधांची खैरात'; मनसेचं ठाकरे सरकारवर टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2020 15:27 IST

त्या इतिवृत्तानुसार ७ ऑगस्टनंतर कोकणात कोणालाही प्रवेश मिळणार नसल्याचीही माहिती पसरली होती. त्यानंतर या विषयावरून बराच गदारोळ झाला.

मुंबई- गेल्या काही दिवसांपासून देशात लॉकडाऊन असल्यानं जिल्ह्याबाहेर जाण्यासाठीही ई-पासची आवश्यकता करण्यात आली आहे. गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या  मोठी आहे. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपूर्वी सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीतील इतिवृत्त बाहेर आलं होतं,  त्या इतिवृत्तानुसार ७ ऑगस्टनंतर कोकणात कोणालाही प्रवेश मिळणार नसल्याचीही माहिती पसरली होती. त्यानंतर या विषयावरून बराच गदारोळ झाला. विरोधकांनी सरकारच्या विरोधात टीकेची झोड उठवली, आता मनसेनंही त्याच मुद्द्यावरून शिवसेनेला कोंडीत पकडलं आहे. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनीदेखील कोकणातील चाकरमान्यांचा प्रश्न उपस्थित करत ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. कोकणात जाण्यासाठी शासनाने काहीच व्यवस्था केली नसल्याचं म्हणत त्यांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांना अडचणी आहेत, पण बकरी ईद साजरी करणाऱ्यांना सुविधा दिल्या जात आहेत, अशी बोचरी टीकाही त्यांनी केली. टीव्ही ९कडे त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कोकणात दरवर्षी मोठ्या प्रमाणात गणेशोत्सवाच्या काळात लोक जात असतात. पण यंदा कोरोनाच्या संकटातही त्यांना गावी जाण्यासाठी शासनाकडून ठोस अशी कोणतीच व्यवस्था नाही.परराज्यांतील लोकांना त्यांच्या राज्यात पाठवण्याची व्यवस्था केली आणि ते जाऊन परतसुद्धा आले आहेत,” असं टीकास्त्र संदीप देशपांडेंनी सोडलं आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे, पण बकरी ईद साजरी करणाऱ्यांना सुविधा दिल्या जात आहेत, असं म्हणत ठाकरे सरकारविरोधात घणाघात  केला. राज्य सरकार काही व्यवस्था करू शकत नसल्यास आम्ही बसेसची व्यवस्था करू, सरकारने आम्हाला परवानगी द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. गणेशोत्सव काळात कोकणात जाणाऱ्यासाठी रेल्वे, एसटी सुरू कराकोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने केलेल्या नियमांचे पालन करत गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या वाहतुकीची व्यवस्था म्हणून कोकण रेल्वे मार्गावर रेल्वे व कोकणात एसटी बस फेऱ्या सुरू कराव्यात, अशी मागणी कोकण रेल्वे समन्वयक समितीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याकडे केली आहे. त्यांनी सरकारला एक निवेदनही दिलं आहे. गणपतीत गावी जाणाऱ्यांची संख्या कमी असली, तरीही गावची घरे संपूर्ण बंद असणे, सर्व नातेवाईक बाहेरगावी असणे या व इतर काही कारणांमुळे बऱ्याच नागरिकांना गावी जाणे भाग असते, असे या निवेदनात म्हटले आहे. 

हेही वाचा

दररोज 3GB डेटा देणारे तीन कंपन्यांचे सर्वात स्वस्त प्लॅन; जाणून घ्या सर्वकाही

"सत्तेसाठी मोदी ताकदवान नेता असल्याची खोटी प्रतिमा पसरवली; आता तीच ठरतेय भारताची दुर्बलता"

भारतीय लष्कराची तयारी पाहून चीन बिथरला; तिबेटमध्ये बनवलं थेट 'उडतं हॉस्पिटल'

सोन्याचे भाव पुन्हा एकदा झाले कमी, असे आहेत आजचे दर

सोन्याची वायदा बाजारातील किंमत कमी झाली; जाणून घ्या...

ग्रामीण बँकांमध्ये 9638 पदांसाठी नोकऱ्यांची खैरात! उद्या संपणार मुदत, असा करा अर्ज

सरकारच्या 'या' योजनेत पाच वर्षांसाठी १ लाख गुंतवल्यावर मिळतोय मोठा लाभ, पैसेही राहणार सुरक्षित

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेRaj Thackerayराज ठाकरे