शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
5
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
6
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
7
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
8
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
9
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
10
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
11
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
12
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
13
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
14
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
15
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
16
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
17
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
18
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
19
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
20
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 

...म्हणून राज ठाकरे लवकरच उद्धव ठाकरे, अमित शहांना भेटणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2020 20:16 IST

राज ठाकरे लवकरच उद्धव ठाकरे आणि अमित शहांची भेट घेणार

मुंबई: राज्यासह देशाच्या काही भागांमध्ये देशविरोधी कट शिजत आहे. याची माहिती देण्यासाठी मी लवकरच मुख्यमंत्री आणि केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घेईन, असं मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पक्षाच्या पहिल्या राज्यव्यापी अधिवेशनात म्हटलं. पाकिस्तान, बांगलादेशमधून आलेल्या घुसखोरांना हाकलून द्या. त्यासाठी माझा मोदी सरकारला पूर्ण पाठिंबा असल्याची भूमिका त्यांनी मांडली. यावेळी त्यांनी मराठी भाषा, हिंदुत्व, सीएए, एनआरसीसारख्या विविध मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली.

सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए), राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) या देशातल्या ज्वलंत विषयांवर राज ठाकरेंनी आज भाष्य केलं. बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोर मुस्लिमांना देशातून बाहेर हाकलून देण्याची गरज आहे. ही भूमिका मी आधीही मांडली आहे आणि त्या भूमिकेवर मी आजही ठाम आहे. घुसखोरांना देशाबाहेर हाकलण्यासाठी माझा केंद्र सरकारला पूर्ण पाठिंबा असल्याचं राज ठाकरे म्हणाले. आज राज्यात बाहेरच्या देशातून आलेले मौलवी जाऊन देशविघातक कारवाया करत आहेत. याबद्दलची माहिती माझ्याकडे आहे. यासाठी मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांची आणि देशाच्या गृहमंत्र्यांची भेट घेणार असल्याचं राज यांनी सांगितलं. बांगलादेश आणि पाकिस्तानी घुसखोर मुसलमानांना देशाबाहेर हाकलून द्यावं यासाठी येत्या ९ फेब्रुवारीला मुंबईत मनसे मोर्चा काढणार आहे. सीएए आणि एनआरसी विरोधात निघणाऱ्या मोर्च्यांना मनसे मोर्च्याने उत्तर देईल, असंदेखील राज म्हणाले.आज राज ठाकरेंनी त्यांच्या भाषणाच्या पहिल्याच वाक्यातून आपली भूमिका स्पष्ट केली. जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांनो-भगिनींनो आणि मातांनो असं म्हणत राज आधी त्यांच्या भाषणांची सुरुवात करायचे. मात्र, आज राज यांनी त्यांच्या भाषणाची सुरुवात, जमलेल्या माझ्या तमाम 'हिंदू' बांधवांनो-भगिनींनो आणि मातांनो, अशी केली. राज यांनी त्यांच्या भाषणाच्या सुरुवातीलाच बदल दाखवून दिला. ज्याप्रमाणे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आपल्या भाषणाची सुरुवात करायचे, अगदी तशीच राज यांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली.  

 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेUddhav Thackerayउद्धव ठाकरेAmit Shahअमित शहा