शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

राज ठाकरे यांच्यावर जामीनपात्र गुन्हा; भाेंग्याच्या आंदाेलनावर मात्र ठाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2022 05:22 IST

भोंगे काढण्याबाबत दिलेल्या इशाऱ्यावर राज ठाकरे ठाम.

औरंगाबाद/मुंबई : येथील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर १ मे रोजी झालेल्या जाहीर सभेत राज ठाकरे यांनी प्रक्षोभक आणि चिथावणीखोर भाषण करून सभेसाठी दिलेल्या अटी, शर्तीचे उल्लंघन केल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवत  सिटी चौक पोलीस ठाण्यात राज यांच्यासह सभेचे संयोजक राजीव जावळीकर व इतरांविरोधात मंगळवारी गुन्हा नोंदविण्यात आला. तर शिवाजी पार्क पोलिसांकडून कलम १४९ अन्वये नोटीस बजावण्यात आली आहे. मात्र तरीही भोंगे काढण्याबाबत दिलेल्या इशाऱ्यावर राज ठाकरे ठाम आहेत. 

पाडव्याच्या सभेत राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे हटविण्याची मागणी केली होती. या मागणीवरून राज्यात दोन धर्मांत तणाव निर्माण होत असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र दिनाच्या सभेला पोलिसांनी सशर्त परवानगी दिली होती. 

भोंगे तिथे हनुमान चालीसा!मशिदींवरील भोंग्याविरोधातील आपली आक्रमक भूमिका कायम ठेवत राज ठाकरे यांनी बुधवारपासून आंदोलनाची घोषणा केली आहे, तसेच बाळासाहेब ठाकरे यांचे ऐकणार की सत्तेवर ज्यांनी बसवले त्या शरद पवारांचे, याचा फैसला एकदा जनतेसमोर होऊन जाऊ दे, अशा शब्दांत राज यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही थेट आव्हान दिले आहे.     

कोणत्या कलमांतर्गत गुन्हाकलम ११६ (जनसमुदायाला गुन्हा करण्यास चिथावणी देणे, प्रवृत्त करणे)कलम ११७ (गुन्हा करण्यास मदत करणे, अपप्रेरणा देणे)कलम १५३ (दंगल करण्यास जनसमुदायाला  चिथावणी देणे)

जामीनपात्र गुन्हेराज यांच्यावर दाखल झालेले गुन्हे जामीनपात्र आहेत. त्यामुळे राज यांना पोलीस ठाण्यात जामीन द्यावा लागेल. या सर्व गुन्ह्यामध्ये सात वर्षापेक्षा कमी शिक्षेची तरतूद असल्याने राज यांना पोलीस नोटीस देऊन तपासामध्ये पोलीस ठाण्यात हजर राहाण्याचे आदेश देऊ शकतात.

शांतता भंग होण्याची भीतीसरकारतर्फे पोलीस उपनिरीक्षक गजानन इंगळे यांनी ३ मे रोजी सिटी चौक पोलीस ठाण्यात नोंदविली. त्यांनी नमूद केले की, राज यांचे वक्तव्य जनसमुदायाला चिथावणी मिळेल, गंभीर शांतता भंग होईल, असे होते. 

सभेआधी केले होते सावध सभेसाठी परवानगी मागणाऱ्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांना असे कोणतेही कृत्य झाल्यास कडक कारवाई होईल, असे समजावून सांगितले होते. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेPoliceपोलिस