शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

नमस्कार, राज बोलतोय! उद्धव ठाकरेंना भेटण्याची इच्छा व्यक्त केलेल्या वृद्ध शिक्षिकेला मनसेप्रमुखांचा फोन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2021 13:17 IST

मनसे प्रमुख राज ठाकरेंचा त्यांच्या माजी शिक्षिका सुमन रणदिवेंना फोन; आवश्यक मदत पूर्ण करण्याचं आश्वासन

वसई: तौत्के चक्रीवादळचा पश्चिम किनारपट्टीला जोरदार तडाखा बसला. यात समुद्र किनाऱ्याजवळ मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. वसई येथील एका वृद्धाश्रमालाही वादळाचा फटका बसला. न्यू लाइफ फाऊंडेशनच्या पहिल्या मजल्यावरील खिडकीचा दरवाजा कोसळून एक वृद्ध नागरिक जखमी देखील झाला. विशेष बाब अशी की या वृद्धाश्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांना शालेय शिक्षण दिलेले शिक्षकही राहत आहेत. सुमन लक्ष्मीकांत रणदिवे (८८) या दादरच्या बालमोहन विद्या मंदिरात गणित आणि विज्ञान विषयाच्या शिक्षिका होत्या. १९९१ साली त्या निवृत्त झाल्या. गेल्या वर्षभरापासून त्या वसईतील न्यू लाइफ फाऊंडेशनच्या वृद्धाश्रमात राहत आहेत. वादळामुळे वृद्धाश्रमाची वास्तू मोडकळीस आली आहे आणि इथल्या अपुऱ्या सुविधांमुळे वृद्धांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. सुमन रणदिवे यांनी मुख्यमंत्र्यांना भेटण्याची इच्छा करत मदतीसाठी आर्जव केलं. यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी सुमन यांच्याशी फोनवरून संवाद साधला."उद्धव बेटा, मला तुला भेटायचंय", मुख्यमंत्र्यांच्या शिक्षिकेचं आर्जव; तौत्के वादळानं वृद्धाश्रम मोडकळीसराज ठाकरेंना फोनवरून नमस्कार करताच सुमन यांनी त्यांच्याकडे आपलं गाऱ्हाणं माडलं. 'वादळामुळे खूप मोठं नुकसान झालंय. जास्तीत जास्त मदत कर,' अशी विनंती सुमन रणदिवे यांनी केली. त्यावर मी अविनाश जाधव यांना सांगितलं आहे. ते नक्की मदत करतील. तुम्ही काळजी करू नका, असं आश्वासन राज यांनी दिलं. यावेळी कुंदा कशी आहे, अशी विचारणा रणदिवेंनी केली. त्यावर आई बरी आहे असं उत्तर राज यांनी दिलं.तू मध्यंतरी इथे आला होतास. पण आपली भेट झाली नाही. एकदा मला भेटायला ये ना, असं म्हणत रणदिवेंनी राज यांच्याकडे भेटण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावर लॉकडाऊन संपू दे. नक्की भेटायला येतो, असा शब्द राज यांनी रणदिवे यांना दिला. तब्येत ठिक आहे ना, अशी विचारपूस राज यांनी केली. रणदिवे यांनीदेखील राज आणि त्यांच्या कुटुंबियांची आस्थेवाईकपणे चौकशी केली.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेRaj Thackerayराज ठाकरेTaufiq Qureshiतौफिक कुरेशी