शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
2
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
3
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
4
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
5
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
6
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
7
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
8
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
9
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
10
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
11
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
12
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
13
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
14
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
15
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
16
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
17
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
18
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
19
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
20
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय

MNS:'हिंदुत्वाच्या मुद्द्यावर सत्तेत आले आणि आता...', मनसे नेत्यांचा सरकारवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2022 21:36 IST

'एकाने राजीनामा दिला म्हणून तांडव करू नका, अनेक मुस्लिम पदाधिकारी अजूनही पक्षात आहेत'- अविनाश जाधव

ठाणे: 9 एप्रिल रोजी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची होणारी सभा आता 12 एप्रिल रोजी होणार आहे. याशिवाय, सभेचे ठिकाणही बदलण्यात आले आहे. मनसे नेत्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन राज ठाकरेंच्या सभेविषयी माहिती दिली. तसेच, यावेळी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन विरोधकांवर टीकाही केली. यावेळी मनसेचे नेते अभिजीत पानसे, सदीप देशपांडे, आमदार राजू पाटील आणि अविनाश जाधव उपस्थित होते.

'सेनेने हिंदुत्व सोडले'यावेळी बोलताना अभिजीत पानसे म्हणाले की, आम्ही 9 तारखेला सभा घेणार होतो, पण नवरात्र सुरू असल्यामुळे अनेकांना त्रास होईल, हे लक्षात घेऊन सभा 12 तारखेला घेण्याचे ठरवले आहे. गडकरी रंगायतन समोरील रस्त्यावर ही सभा होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच, राजकीय सभेला परवानगी द्यायला 10 तास लागत असतील पोलिसांवर कोणाचा दबाव आहे? असा सवाल त्यांनी यावेळी केला. याशिवाय, हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन सत्तेवर आले आणि आता हाच मुद्दा सोडून दिला, असा टोला त्यांनी शिवसेनेला लगावला.

...तर ठाण्यात येऊन धमक्या द्यायावेळी मनसे नेते संदीप देशपांडे यांनीही सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. आमच्या सभेला परवानगी देऊ नये म्हणून यांचे मंत्री फोन करतात. ही नाटकं समजणार नाही इतके आम्ही दुधखुळे नाही. यांना आता लोकशाही आठवत नाही का? असा सवाल देशपांडे यांनी केला. याशिवाय, मुंब्रामधील कार्यालयाच्या जागी कोणी येऊ शकले नाही, तो मुद्दा आमच्या साठी संपला. हिम्मत आहे तर ठाण्यात येऊन अशा धमक्या द्या, असा इशारा मनसे नेते अविनाश जाधव यांनी यावेळी दिला.

निष्ठावान कार्यकर्ते पक्षात आहेतयावेळी अविनाश जाधव यांनी पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्यावरही भाष्य केले. एका शाखाध्यक्षने राजीनामा दिला म्हणून इतका तांडव करू नये, असे खूप मुस्लिम कार्यकर्ते पदाधिकारी आहेत जे अजूनही पक्षात आहेत. वसंत मोरे अजूनही पक्षात आहेत, ते निष्ठावन आहेत. 12 तारखाला तेदेखील सभेला येतील, त्यामुले ज्या बातम्या सुरू आहेत त्या खोट्या आहेत, असे जाधव म्हणाले. 

टॅग्स :MNSमनसेAvinash Jadhavअविनाश जाधवSandeep Deshpandeसंदीप देशपांडेRaj Thackerayराज ठाकरे