MLC ELETION- भाजपचे प्रवीण पोटे विक्रमी मतांनी विजयी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2018 14:00 IST2018-05-24T14:00:34+5:302018-05-24T14:00:34+5:30
विधान परिषदेच्या अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात भाजपeचे उमेदवार प्रवीण पोटे ४४१ मतांनी विजयी झाले. त्यांचे प्रातिस्पर्धी काँग्रेसचे उमेदवार अनिल माधोगडीया यांना केवळ १७ मते पडली.

MLC ELETION- भाजपचे प्रवीण पोटे विक्रमी मतांनी विजयी
अमरावती : विधान परिषदेच्या अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात भाजपeचे उमेदवार प्रवीण पोटे ४४१ मतांनी विजयी झाले. त्यांचे प्रातिस्पर्धी काँग्रेसचे उमेदवार अनिल माधोगडीया यांना केवळ १७ मते पडली. यामध्ये त्यांच्या स्वत:च्या एक मताचा समावेश आहे. या निवडणुकीसाठी सोमवारी ४८८ मतदान झाले. गुरूवारी सकाळी ८वाजता मतमोजणी सुरू झाली. यामध्ये १o मते अवैध ठरली तर ३ मते नोटाला पडली. यामुळे विजया साठी २३८ मतांचा कोटा ठरला. सकाळी ९.३0 वाजता निकाल जाहीर झाला. यामध्ये भाजपाची १९९ मते असतांना पोटे यांना ४५८ मते पडली तर काँग्रेसचे १२८मते असताना माधोगडीया यांना फक्त १७ मते पडली, पोटे यांना एकूण मतदानाच्या तुलनेत ९८ टक्के पडली. त्यांना शिवसेना, प्रहार, राकॉ, मनसें, एमआयएम, सपा यांचेसह ३३ अपक्षांचीही मते मिळाली. पोटे यांचा विक्रमी मतांनी विजय झाला.