शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

"आमदार संपर्कात, शिंदे-ठाकरे गटाचे दावे-प्रतिदावे; भाजपा म्हणतं, २०२४ पर्यंत.."

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2022 12:58 IST

उर्वरित १०-१५ आमदार शिवसेनेत राहतील का? याची काळजी खैरेंनी करावी असा टोला भाजपा आमदार नितेश राणेंनी लगावला. 

मुंबई - राज्यात सत्तांतर झाल्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात शिवसेनेतील वर्चस्वाची लढाई सुरू आहे. शिवसेनेच्या एकूण आमदारांपैकी दोन तृतीयांश आमदार हे शिंदे गटात सहभागी झालेत. ठाकरे गटातील २-३ आमदार लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेत सहभागी होतील असा दावा मंत्री संदीपान भुमरे यांनी केला तर त्याला प्रत्युत्तर देत शिंदे गटाचेच १०-१५ आमदार आमच्या संपर्कात असल्याचा प्रतिदावा माजी खासदार चंद्रकांत खैरेंनी केला. 

चंद्रकांत खैरे म्हणाले की, शिवसेनेचे कुणीही तिकडे जाणार नाही. परंतु शिंदे गटातील अनेक आमदार अस्वस्थ आहेत. आम्हाला फोन करून चुकलो म्हणतात. १०-१५ आमदार आहेत जे संपर्कात आहेत. भाजपा काहीही गेम खेळतील आणि सरकारमध्ये पूर्ण बहुमत सिद्ध करत आपल्याला आऊट करतील हे आमदारांना कळालंय असं त्यांनी म्हटलं. 

तर शिवसेना-भाजपा युतीचं सरकार अतिशय ताकदीने महाराष्ट्रात काम करतेय. विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशनही सरकारने यशस्वीपणे सांभाळलं. येणारी अडीच वर्ष, २०२४ पर्यंत महाराष्ट्रात हेच सरकार कायम राहणार आहे. त्यामुळे हे आमच्या संपर्कात अशी विधाने केली जात आहे. उर्वरित १०-१५ आमदार शिवसेनेत राहतील का? याची काळजी खैरेंनी करावी असा टोला भाजपा आमदार नितेश राणेंनी लगावला. 

काय म्हणाले होते संदीपान भुमरे?  संदीपान भुमरे यांनी पैठण येथील कार्यक्रमात बोलताना हा दावा केला. भुमरे यांनी युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला. उद्धव सेनेत सध्या मुक्कामी असलेले दोन आमदार लवकरच फुटून शिंदे सेनेत येणार आहेत. एक जण येऊन आम्हाला भेटला असून दुसरा सुद्धा संपर्कात असल्याचे भुमरे यांनी सांगितले. कोकण, मराठवाड्यातील आमदार संपर्कात आहेत. त्याचसोबत मराठवाड्यातील जिल्हाप्रमुख १-२ वगळता सगळेच संपर्कात आहेत. ८० टक्के पदाधिकारी आमच्या संपर्कात आहेत. जसजसे भेटतील तसे पक्षप्रवेश होतील असं भुमरेंनी म्हटलं. मात्र भुमरेंच्या या दाव्यावर ठाकरे गटातील आमदार अंबादास दानवे यांनी टीका केली. पैठणमधील भूमरेंच्या कार्यक्रमाला ५० लोकही नव्हते. अनेक खुर्च्या रिकाम्या होत्या. त्यामुळे आधी स्वत:चं सांभाळा, अशी टीका अंबादास दानवेंनी केली होती. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपा