शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: मुंबई लोकल सेवा बंद, मोटरमनसह रेल्वे कर्मचाऱ्यांचे सीएसएमटी स्थानकात आंदोलन
2
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
3
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
4
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
5
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
6
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
7
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
8
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
9
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
10
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
11
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
12
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
13
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
14
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
15
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
16
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
17
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
18
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
19
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
20
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण

"बाबा सिद्दीकी यांचा राजीनाम्याचा निर्णय अत्यंत निराशाजनक आणि सर्वात खेदजनक आहे"

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2024 12:35 IST

Baba Siddique Resigns from Congress: पक्ष अडचणीत असताना सिद्दीकी यांनी पक्ष सोडल्याने वर्षा गायकवाड यांनी त्यांना लक्ष्य केले.

Varsha Gaikwad On Baba Siddique: महाराष्ट्र काँग्रेसला धक्का देत माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांनी आज पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. सिद्दीकी यांच्या या निर्णयामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. सिद्दीकी यांच्या निर्णयानंतर माजी मंत्री आणि आमदार वर्षा गायकवाड यांनी त्यांच्यावर निशाणा साधला. पक्ष अडचणीत असताना सिद्दीकी यांनी पक्ष सोडल्याने वर्षा गायकवाड यांनी त्यांना लक्ष्य केले. सिद्दीकी म्हणाले की, मी तरुण असताना काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता आणि आज ४८ वर्षांनी पक्ष सोडत आहे. माझा हा प्रवास खूप छान होता. मी आज माझ्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. अजून अनेक गोष्टी आहेत ज्या आता सांगणे योग्य होणार नाही. काही गोष्टी या न सांगितलेल्याच बऱ्या असतात. माझ्या या प्रवासात ज्या-ज्या लोकांनी मला पाठिंबा दिला, त्यांचा मी आभारी आहे.

सोशल मीडियावर पोस्ट करत वर्षा गायकवाड यांनी म्हटले, "तुमच्यावर काँग्रेस पक्षाने ठेवलेला विश्वास, दिलेला एवढा सन्मान असे असताना देखील तुम्ही पक्षातून बाहेर जात आहात हा तुमचा निर्णय अत्यंत निराशाजनक आणि सर्वात खेदजनक आहे. आपला देश एका नाजूक वळणावर असताना आणि संपूर्ण काँग्रेस परिवार भाजपाने केलेल्या लोकशाहीच्या हत्येविरुद्ध लढण्यात व्यग्र असताना तुम्ही हे करण्याचे निवडले आहे. हे अगदी खरे आहे, तुम्ही म्हटल्याप्रमाणे सर्वकाही सांगणे योग्य नसते. असो काँग्रेस पक्ष आपल्या शहराची, देशाची सेवा प्रामाणिकपणे आणि समर्पणाने करण्याच्या वचनबद्धतेवर ठाम आहे. या प्रकारच्या घटना आमच्या मार्गात अडथळा आणू शकत नाहीत. आमचे एकच लक्ष्य आहे, सर्वांसाठी न्याय." 

महाराष्ट्र काँग्रेसला आणखी एक धक्कालोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत काँग्रेसला माजी मंत्री मिलिंद देवरां यांच्या रुपाने मोठा धक्का बसला होता. त्यातच आता काँग्रेसला आणखी एक धक्का बसला. काँग्रेसचे वांद्रे येथील बडे नेते माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेसला रामराम केले. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सिद्दिकी हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात प्रवेश करण्यासाठी गाठीभेटी घेत आहेत. या वाटाघाटी यशस्वी झाल्या आहेत, त्यामुळे ते लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात प्रवेश करण्याची चर्चा आहे. काँग्रेसमध्ये महत्त्व मिळत नसल्याने तसेच महाविकास आघाडी सरकार असताना निधी वाटपात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून झालेल्या कथित अन्यायाच्या पार्श्वभूमीवर सिद्दीकींची नाराजी वाढत गेली असे सांगण्यात येत आहे. अशा परिस्थितीत गेली ४८ वर्षे काँग्रेसशी एकनिष्ठ असलेल्या बाबा सिद्दीकींनी पक्षाला रामराम ठोकल्याचे सांगितले जात आहे.

टॅग्स :Varsha Gaikwadवर्षा गायकवाडcongressकाँग्रेसPoliticsराजकारणMumbaiमुंबई