आमदार सुमनताई पाटील रस्ता अपघातात जखमी
By Admin | Updated: May 24, 2017 22:57 IST2017-05-24T22:57:56+5:302017-05-24T22:57:56+5:30
तासगांव कवठेमहांकाळ मतदारसंघाच्या आमदार सुमनताई आर.आर. पाटील यांच्या गाडीला पुणे वारजे येथे बुधवारी सायंकाळी साडे सातच्या दरम्यान अपघात झाला.

आमदार सुमनताई पाटील रस्ता अपघातात जखमी
>ऑनलाइन लोकमत
तासगाव(सांगली), दि. 24 - तासगांव कवठेमहांकाळ मतदारसंघाच्या आमदार सुमनताई आर.आर. पाटील यांच्या गाडीला पुणे वारजे येथे बुधवारी सायंकाळी साडे सातच्या दरम्यान अपघात झाला. आमदारांच्या गाडीचे टायर फुटल्याने गाडी बाजूच्या पुलाच्या कठड्याला धडकली. यावेळी गाडीत आमदार सुमनताई पाटील यांच्यासह रोहित पाटील व कुटुंबीय होते.आमदारांच्या कानाच्या पाठीमागे थोडी जखम झाली.मात्र वारजे येथे रुग्णालयात त्यांच्यावर तात्काळ उपचार करण्यात आले. मुंबईहून तासगावकडे परतताना हा अपघात घडला. यात सर्वजण सुखरुप आहेत.उपचारानंतर रात्री साडेदहाच्या दरम्यान ते तासगावला रवाना झाले.