शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

ठाकरे गटाला मिळालेले नाव उद्धव कॉंग्रेस सेना; आमदार रवी राणांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2022 11:41 IST

शिवसेनेत दोन गट पडल्यामुळे निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठवले. निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना शिवसेना नावही तात्पुरते न वापरण्याचे आदेश दिले आहेत.

मुंबई: शिवसेनेत दोन गट पडल्यामुळे निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठवले. निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना शिवसेना नावही तात्पुरते न वापरण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता निवडणूक आयोगाने दोन्ही गटाला नवी नावे दिली आहेत. उद्धव ठाकरे यांच्या गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असं नाव दिले आहे, यावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. आमदार रवी राणा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. 

'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही खरी शिवसेना नाही. एकनाथ शिंदे यांची बाळासाहेबांची शिवसेना ही खरी शिवसेना आहे. त्यांची सेना ही उद्धव काँग्रेस सेना आहे, असा टोला आमदार रवी राणा यांनी लगावला. येणाऱ्या निवडणुकांमध्ये एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजप विजय मिळवेल, असंही आमदार रवी राणा म्हणाले. 

"आमच्याकडे प्रथम बाळासाहेब नंतर पक्षाचे नाव, दुसऱ्यांकडे अगोदर मी नंतर बाळासाहेब"

"आमच्याकडे प्रथम बाळासाहेब नंतर पक्षाचे नाव : शितल म्हात्रे

शिवतीर्थावरील ठाकरेंच्या मेळाव्यात शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी मैदान गाजवले. त्यानंतर, शिंदे गटाकडून शितल म्हात्रे यांनी सुषमा अंधारेंवर पलटवार केला. तसेच, शिवसेनेकडून होणाऱ्या टिकेला शिंदे गटाच्या प्रवक्त्त्या बनून शितल म्हात्रे प्रत्युत्तर देत आहेत. शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह गोठवल्यानंतरही त्यांनी ट्विट करुन भूमिका मांडली होती. आता, शिवसेना आणि शिंदे गटाला दिलेल्या नावारुन त्यांनी शिवसेनेवर टिका केली आहे. तसेच, धनुष्यबाण हे चिन्ह भविष्यात आम्हालाच मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, बाळासाहेबांची शिवसेना हे नाव शिंदे गटाला मिळाले असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव उद्धव ठाकरे गटाला मिळाले आहे. त्यावरुन, म्हात्रे यांनी शिवसेनेवर व्हिडिओच्या माध्यमातून टिका केली आहे. 

शिवसैनिकांच्या मनातील नाव बाळासाहेबांची शिवसेना हे नाव एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला मिळालं असून ही आमच्यासाठी समाधानाची गोष्ट आहे. आमच्या नावामध्ये प्रथम बाळासाहेब नंतर पक्षाचं नाव आहे. बाकीच्यांना जे मिळालंय त्यात प्रथम मी नंतर बाळासाहेब.. लोकांना याचा अर्थ कळत असेल. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आम्ही आमचं चिन्ह आयोगाकडे देऊ. मात्र, हे चिन्ह तात्पुरतं असेल, भविष्यात धनुष्यबाण हेच चिन्ह आम्हाला मेरीटवर मिळेल, असा विश्वासही शितल म्हात्रे यांनी व्यक्त केला. 

टॅग्स :Ravi Ranaरवी राणाShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे